धनप्राप्तीसाठी आज विनायकीच्या मुहूर्तावर अशी करावी गणरायाची पूजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:38 IST2021-03-17T15:38:13+5:302021-03-17T15:38:30+5:30
अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी, नोकरी धंद्यात अपयशी ठरलेले लोक, तसेच विविध कलांमध्ये रस असणाऱ्या लोकांनी ही उपासना जरूर करावी.

धनप्राप्तीसाठी आज विनायकीच्या मुहूर्तावर अशी करावी गणरायाची पूजा!
आज विनायकी चतुर्थी आहे आणि आज बुधवार आहे. मंगळवार हा गणरायाचा दिवस आणि बुधवार चंद्राचा. गणरायाला चंद्र प्रिय आहे. त्याने आपल्या वडिलांप्रमाणे मस्तकावर चंद्र धारण केला म्हणून त्याला भालचंद्र अशी ओळख मिळाली. आज चतुर्थीच्या निमित्ताने दोन्ही देवतांचा एक वार जुळून आला आहे. गणपती ही बुद्धी आणि यशाची देवता, तर चन्द्र कलेची, भरभराटीची, वैभव देणारी देवता. या दोहोंची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, म्हणून आजपासून दर बुधवारी गणरायाला आणि पर्यायाने चंद्राला पुढील नैवेद्य दाखवा. बुधवारी केलेली गणेशपूजा शीघ्र फलदायी ठरते. अभ्यासात मागे असलेले विद्यार्थी, नोकरी धंद्यात अपयशी ठरलेले लोक, तसेच विविध कलांमध्ये रस असणाऱ्या लोकांनी ही उपासना जरूर करावी.
सायंकाळी शुचिर्भूत होऊन गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा आसनावर स्थापित करावी. गंध, अक्षता, फुलं वाहून 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच २१ दुर्वा वहाव्यात.
धनप्राप्तीसाठी गणपतीला तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा.
घरात गणपतीची संगमरवरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीची पूजा अधिक फलदायी ठरेल.
लक्ष्मी प्राप्तीच्या दृष्टीने आज व्यवहार करताना आवक आली तरी चालेल, परंतु लक्ष्मी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आजच्या दिवशी केलेली आर्थिक गुंतवणूक दुप्पट लाभ मिळवून देईल.