शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात कशी मिळवाल परिपूर्णता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 12:45 IST

जर तुम्हाला आंतरिक परिपूर्णता लाभली असेल, तर तुम्हाला बाह्य कृतीची काही गरज उरणार नाही. जर बाह्य जगात काही करणे गरजेचे असेल तर ती तुम्ही आनंदाने करता.

सद्गुरू: परिपूर्णता ही काही कुठल्या कृतीतून मिळवता येत नाही. जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर तुम्हाला असे वाटले होते की, “अमुक असे झाले, तर माझे जीवन सफल होईल.” जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तर तुम्ही असा विचार केला असेल की, “जर मला हे खेळणे मिळाले तर माझे जीवन अगदी सफल होईल.” ते खेळणे मिळाल्यानंतर काही आठवड्यातच तुम्हाला त्याची पर्वा राहिली नाही. आणि जीवन काही सफल झाले नाही. शिकत असताना तुम्हाला वाटले असेल की परीक्षेत पास झालो तर माझे आयुष्य सफल होईल. ते झाले पण आयुष्य सफल काही झाले नाही. मग तुम्ही विचार केला असेल की, शिक्षण पूर्ण झाले की माझे आयुष्य सफल होईल. शिक्षणही झाले. मग विचार आला की, स्वतःच्या पायावर उभे राहू शकला नाहीत तर शिक्षणाचा काय उपयोग? तेही झाले. तीन एक महिन्यात तुम्ही विचार केला असेल की, गाढवासारखे नुसतेच काम करून काय उपयोग? तुमच्या मनात घर केलेल्या मुलीशी/मुलाशी लग्न केल्यावर जीवन सफल होईल. तेही झाले, आणि मग तुम्हाला माहीतच आहे काय झाले!ज्या काही कृती केल्या असतील, पण जीवनात सार्थकता लाभलेली नाही. सार्थकता ही काही कोणत्या कृतीने लाभणार नाही. जेव्हा तुम्ही आतून परिपूर्ण व्हाल, तेव्हाच जीवन सफल होईल. जर तुमचे आंतरिक स्वरूप अबाधित असेल तर तुमचे जीवनही अबाधित असेल. आणि मग, तुम्ही डोळे बंद करून बसलात काय किंवा वेगवेगळ्या कार्यकृती केल्यात काय, कोणत्याही स्थितीत तुमचे जीवन परिपूर्ण असेल. जेव्हा एखादा मनुष्य अशा अवस्थेत पोचतो की त्याला स्वत:साठी कुठलीही कृती करण्याची गरज उरत नाही आणि तो केवळ बाह्य जगात जे गरजे आहे त्यासाठी आवश्यक ती कृती तो करतो, तेव्हा तो मनुष्य परिपूर्ण झालेला असतो.जर तुम्हाला आंतरिक परिपूर्णता लाभली असेल, तर तुम्हाला बाह्य कृतीची काही गरज उरणार नाही. जर बाह्य जगात काही करणे गरजेचे असेल तर ती तुम्ही आनंदाने करता. जर त्याची गरज नसेल, तर तुम्ही डोळे मिटून गप्प बसू शकता. एखादी व्यक्ती, जेव्हा अश्या स्थितीला पोचते की तिला कृती करण्याची काही गरज राहिली नाही, तेव्हा आपण म्हणून शकतो की ती व्यक्ती अमर्याद झाली आहे. याचा अर्थ असा नाही की ही व्यक्ती काहीच कार्य करत नाही. जर बाह्य परिस्थितीची मागणी असेल, तर तो चोवीस तास देखील काम करू शकतो. पण त्याला आपल्या आंतरिक परिपूर्ततेसाठी कुठल्याही कृतीची गरज नाही. तो कुठल्या कृतीला बांधील नाही. कृती केली किंवा नाही त्याच्यात काहीही फरक पडत नाही.

तुम्ही एकामागून एक कृती का करत आहात याचा जरा विचार करा. ते परिपूर्णतेसाठीच. जे लोक गरजे बाहेर, अतोनात कृती करतात, त्यांना जर विचारले की ते सगळी धडपड का करत आहात, तर ते म्हणतील की, काय करू? अन्न, वस्त्र, निवारा, नवरा/बायको, मुलं – त्यांची काळजी कोण घेईल? पण खरं पाहता, जरी त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या तरीही असा माणूस एक दिवस देखील शांत बसू शकत नाही. तो दोन-तीन तास देखील बसू शकत नाही. त्याने काही ना काही करायलाच हवं. याचे कारण तुम्हाला आंतरिक परिपूर्णता लाभलेली नाही आणि ती तुम्ही तुमच्या बाह्य कृतींमधून मिळवायचा प्रयत्न करत आहात. तुमच्या कार्यकृती उपजीविका किंवा सुखसोयी मिळवण्यासाठी होत नाहीयेत. त्या परिपूर्णतेच्या प्राप्तीसाठी होत आहेत. मग हे जाणीपूर्वक होत असो किंवा अजाणपणे, तुमच्या कृती तुम्ही अमर्यादतेचा शोधात आहात हे दर्शवतात.