शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Hanuman Jayanti 2023: शुभ योगात हनुमान जयंती: ‘असे’ करा हनुमंतांचे पूजन; पाहा, पूजाविधी, मुहूर्त अन् महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 11:42 IST

Hanuman Jayanti 2023: हनुमान जयंतीला मारुतीरायाच्या पूजाविधीचा शुभ मुहूर्त, सोप्या पद्धतीने करावयाचा पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या...

Hanuman Jayanti 2023: चैत्र महिन्यात गुढी पाडवा, श्रीराम जयंतीनंतर अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे हनुमान जयंती. हनुमंत, मारूती, बजरंगबली, रामभक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केसरीनंदन अशा अनेक नावाने मारुतीरायाला संबोधले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. मात्र, हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही. संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. काही ठिकाणी हनुमान जयंती कार्तिक महिन्यात साजरी केली जाते. यंदाच्या हनुमान जयंतीला सर्वार्थ सिद्धि योगासह अनेक शुभ योग जुळून येत आहेत. जाणून घेऊया, शुभ मुहूर्त, पूजा करण्याची सोपी पद्धत आणि महत्त्व.

हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ ०५ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजून १९ मिनिटांनी होत आहे. तर पौर्णिमेची सांगता ०६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजून ०४ मिनिटांनी होत आहे. मात्र, पौराणिक मान्यतांनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे हनुमानाचे पूजन ०६ एप्रिल रोजी करावे, असे सांगितले जात आहे. 

हनुमान जयंतीचे शुभ मुहूर्त

हनुमान जयंतीला ६ एप्रिल रोजी सकाळी ०६ वाजून ०६ मिनिटे ते ०७ वाजून ४० मिनिटांपर्यंत हनुमान जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून २४ मिनिटे ते ०१ वाजून ५८ मिनिटांपर्यंत पूजा करू शकता. याशिवाय सायंकाळी ०५ वाजून ३० मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत हा पूजेचा शुभ मुहूर्त असल्याचे सांगितले जात आहे. 

हनुमान जयंती पूजनविधी

सकाळी नेहमीप्रमाणे नित्यकर्म उरकून घ्यावीत. हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमेचे पूजन करावयाची जागा स्वच्छ करून घ्यावी. हनुमानाची मूर्ती वा प्रतिमा स्थापन करावी. हनुमान पूजनाचा संकल्प करावा. हनुमानाचे आवाहन करावे. आवाहन करताना हनुमान, श्रीराम आणि सीता मातेचे स्मरण करावे. पूजाविधी करताना ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. सुरुवातीला गणपती पूजन करावे. यानंतर हनुमानाला पंचामृत स्नान घालून अभिषेक करावा. यानंतर हनुमान स्तोत्र, हनुमान चालिसा, बजरंग बाण, रामस्तुती यांचे यथाशक्ती पठण करावे. चंदन, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. पूजाविधी करताना हनुमानाला तेल, शेंदुर, रूईची फुले, पाने अर्पण अवश्य अर्पण करावीत. यानंतर हनुमानाची आरती करावी. हनुमानाचे नामस्मरण करून पूजेची सांगता करावी. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून संकल्प पूर्ण करावा.  जाणून घ्या महत्त्व

हनुमान जयंतीच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी मारुतीराय पूजन करणार्‍या व्यक्तीला सर्व रोग आणि दोषांपासून दूर ठेवतात. सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतात. जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-शांतात प्राप्त होते. यासोबतच शनीदेवाची प्रतिकूल स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत केल्यास शनीदोष दूर होऊन त्रासांपासून मुक्तता मिळू शकते, असे सांगितले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती