शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

Guru Pushyamrut Yoga 2024: दिवाळीपूर्व येणार्‍या गुरु पुष्यामृत योगावर 'या' गोष्टी लक्षपूर्वक टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 10:50 IST

Guru Pushyamrut Yoga 2024: २४ ऑक्टोबर रोजी गुरु पुष्यामृत योग आहे, दिवाळीनिमित्त या मुहूर्तावर खरेदी करणार असाल तर महत्त्वाचे नियम वाचून मगच खरेदी करा.

२४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग (Gurupushyamrut Yoga 2024 ) जुळून आला आहे. हा योग सकाळी ०६.३८ पासून दुसर्‍या दिवशी अर्थात शुक्रवारी ०६. ३८ मिंनिटांपर्यंत असणार आहे. गुरुवार दत्तगुरूंचा आणि गुरुपुष्यामृत योग माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा आहे. गुरु पुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो. या मुहूर्तावर शुभ कार्य केली जात नाहीत परंतु शुभ गोष्टींचा शुभारंभ निश्चितच केला जातो. या मुहूर्तावर सोने खरेदी केली असता धनसंपत्तीत वाढ होते. या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्त्वाचा आहेच, शिवाय या निमित्ताने आणखी काय केले जाते तेही जाणून घेऊ!

गुरु पुष्यामृत मुहूर्त:   

गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. 

गुरु पुष्यामृत योगावर काय करतात?

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात. याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक, खरेदी, नवीन व्यवसायाची सुरूवात, विद्यारंभ म्हणजेच शिक्षणाची सुरुवात केली जाते. हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे. मात्र या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण, तसेच इतर सर्व धार्मिक /अध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो. या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल. तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल. 

पुष्यामृत (Guru Pushyamrut 2024) गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो. या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, श्रीविष्णू आणि गणपती, शंकराची पूजा करावी. लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्ती चा आशीर्वाद देणारे आहेत, पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो. लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच म्हत्ववाचे आहे. म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी. घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त , पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते. 

गुरु पुष्यामृत योगावर पुढील गोष्टी टाळा!

गुरुपुष्यामृत (Guru Pushyamrut 2024) हा मुहूर्त शुभ असला, तरी विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो. कारण, गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर खुद्द दत्त गुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरु वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी पण मंगलकार्य टाळावे. मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Astrologyफलज्योतिषShoppingखरेदीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४