शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

Guru Purnima 2025: शनि महाराजही आपले गुरु; गुरुपौर्णिमेला आठवणीने द्या 'ही' गुरुदक्षिणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:58 IST

Guru Purnima 2025: आपल्या आयुष्याच्या खडतर काळात आपली परीक्षा घेणारे आणि मोबदल्यात भरभरुन सुख देणार्‍या शनिदेवांना गुरुपौर्णिमेला 'ही' गुरुदक्षिणा द्या.

गुरुपौर्णिमेनिमीत्त(Guru Purnima 2025) आपण आपल्या आयुष्यातील समस्त गुरूंना अभिवादन करणार आहोतच, त्याबरोबरीने आपल्या आयुष्याला शिस्त लावणारे आणखी एक गुरु म्हणजे शनी देव यांना विसरू नका. जन्माला आल्यापासून आपल्या वृद्धापकाळापर्यंत तीन टप्प्यात साडेसातीला सामोरे जावे लागते आणि तेव्हा आपल्याला आठवण होते ती शनी देवांची! त्यापेक्षा कायमस्वरूपी त्यांची आठवण ठेवून त्यांच्या शिस्तीनुसार राहिले तर त्यांचा त्रास कधीच उद्भवणार नाही, त्यासाठी ज्योतिष विशारद चेतन साळकर यांच्याकडून जाणून घेऊया उपाय. 

Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरु उदय; 'या' राशींवर पडणार जबरदस्त प्रभाव, होणार भाग्योदय!

ब्रम्हांडात इतके करोडोंच्या संख्येत ग्रह तारे , कैक आकाशगंगा , लाखो सूर्य , नक्षत्रे विखुरलेली आहेत की त्याची गणना करणे अत्यंत कठीण, नव्हे नव्हे ते मानवाच्या बुध्दीला अशक्यच!! त्यात हे शनी महाराज म्हणजे एक असा विषय जो केवळ ग्रह आणि भौगोलिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मनुष्य जातीचा हित पाहणे हा आहे. उरलेले ११ ग्रह कोणत्या ना कोणत्या आसक्ती खाली आहेत. अगदी गुरु म्हटले तरी मान-सन्मान , ज्ञान याची आसक्ती आहेच. शनी मात्र एकमेव असा ग्रह ज्यांना कसलीच आसक्ती नाही. 

||जीवासवे जन्मे मृत्यू || जोडजन्म ज्यात ||  दिसे भासते ते सारे || विश्व नाशवंत |||| काय शोक करिसी वेड्या || स्वप्नीच्या फळांचा || पराधीन आहे जगती || पुत्र मानवाचा ||

शनी महाराज हे असे धडे देत असतात. असे शनी महाराज आपले गुरु आहेत. कडक , शिस्तप्रिय , करड्या आवाजात सूनावणारे आणि मार्गावर आणणारे हे गुरु आहेत. साहजिकच आहे आपल्याला शाळेत ओरडणारे आणि धपाटे मारणारे शिक्षक आवडत नसतातच, परंतु मोठे झालो की कळते ते धपाटे किती महत्त्वाचे होते आपल्याला शिस्त आणि मार्गावर आणण्यासाठी. ही आमची शनी माऊली सुध्दा कशी बरोबर आपल्याला मार्गावर आणते. आता त्यासाठी काही फटके द्यावे लागणारच. ते आपण समजून घ्यायला हवे ना.

शनीची गुरुदक्षिणा : आपापल्या सर्व गुरूंचे स्मरण करून त्यांना योग्य तो मोबदला देण्याचा गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवस. शनी माऊलीला सुध्दा आपण दक्षिण द्यायला हवीच ना!!

• आपल्यात असलेला अहं ताबडतोब काढून टाकणे• आसक्तीविरहित जगणे• समाधानी राहणे• सत्य आणि प्रामाणिक राहून कर्तव्य करणे• अधर्माची साथ न देणे• मोक्षाकडे वाटचाल करणे• अध्यात्म करणे

गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा!

कुठल्याही वस्तू स्वरूपात दक्षिणा देण्यापेक्षा वरील गोष्टी आपण केल्या तर ही दक्षिणा शनी महाराजांसाठी खरीखुरी ठरेल. गुरु महाराज आणि शनी महाराज दोन्ही ही आपल्या मार्गाने आपल्याला मार्गावर आणण्याचा यत्न करीत असतात. काय गंमत आहे बघा , कुंडलीत गुरु बळ नसेल तरीही आणि शनी महाराज शुभ नसतील तरीही व्यक्ती भरकटलेली , दुःखी आणि असमाधानी असते. गुरु महाराजांविषयी तर सर्वच बोलतात पण शनी महाराज सुध्दा तेच करू करतात. फरक एवढाच आहे की , गुरु महाराज गोडीगुलाबीने करतात शनी महाराज कठोरपणे!

चातुर्मास(Chaturmas 2025) : 

चातुर्मासातील अध्यात्माचे फळ पुण्यसंचय वाढवणारे असते. या चातुर्मासात जितके जास्त अध्यात्म आणि सन्मार्ग तुम्ही चालाल तेवढे पुण्य जास्त पदरात पडेल. "जो कोणी भक्त चातुर्मासात अध्यात्म करेल , सात्विक प्रवृत्तीचे आचरण ठेवेल , विष्णू भक्तिमध्ये स्वतःला झोकून देईल त्या भक्ताला वैकुंठ पाप्त होईल" असे प्रत्यक्ष नारायणाचे वचन आहे.

• या चातुर्मासात अधिकाधिक अध्यात्मावर जोर द्या.• प्रपंच करता करता अध्यात्मालाही वेळ द्या. • विष्णुपुराण पठण करा.• विष्णूसहस्त्रनामावली पठण करा.• गुरुचरित्रपारायण केले तरी उत्तम.• जपजाप्य / नामस्मरण / मानसपूजा हे जे काही कराल त्याचा साठा तुमच्याच पदरात पडणार आहे , हे कायम लक्षात ठेवा.

अशा रीतीने शनी देवांची कडक शिक्षक म्हणून भीती न बाळगता त्यांना अपेक्षित असलेली शिस्त अंगीकारावी. ज्यामुळे शनी देवांची कृपादृष्टी राहीलच आणि आयुष्याला सकारात्मक वळणही मिळेल!

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाPuja Vidhiपूजा विधीAstrologyफलज्योतिषIndian Festivalsभारतीय उत्सव-सण