Guru Purnima 2021: गुरुपौर्णिमा: स्वामी समर्थ म्हणतात, सद्गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावे; वाचा, बोधकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:54 PM2021-07-21T20:54:08+5:302021-07-21T20:58:40+5:30

Guru Purnima 2021: आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी.

guru purnima 2021 swami samarth maharaj says that always be loyal to sadguru | Guru Purnima 2021: गुरुपौर्णिमा: स्वामी समर्थ म्हणतात, सद्गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावे; वाचा, बोधकथा

Guru Purnima 2021: गुरुपौर्णिमा: स्वामी समर्थ म्हणतात, सद्गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावे; वाचा, बोधकथा

Next

श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रेय, दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु होते. शेगावीचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा यांच्यासह वामनबुवा वामोरीकर, माटेबुवा, माणिक प्रभू महाराज, नरसिंह सरस्वती, जंगली महाराज, बीडकर महाराज यांसारखे शेकडो शिष्य स्वामी समर्थ महाराजांचे होते. स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर, हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहण करावे. परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे स्वामी सांगायचे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी कोट्यवधी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी स्वामी नामाने चिंता मिटतात, असे अनेक अनुभवही स्वामी भक्तांना आले आहेत. स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश आणि शिकवण कालातीत असून, ती समजाला नेहमीच बोधप्रद ठरत असते. स्वामी समर्थ महाराजांनी सद्गुरूशी नेहमी एकनिष्ठ असावे, अशी शिकवण, उपदेश स्वामींनी दिला. जाणून घेऊया...

एके दिवशी स्वामी भक्तांना एक गोष्ट सांगत असतात. एक माणूस होता, तो वाराप्रमाणे देवाची भक्ती करायचा. सोमवारी शिवाची, गुरुवारी दत्ताची, शुक्रवारी देवीची. एक दिवस तो पाण्यात पडला. एका देवाला बोलावले, तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला, दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला, दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्याचा धावा केला. या प्रकाराने एकही देव मदतीला आला नाही आणी त्या माणसाला जलसमाधी मिळाली. या गोष्टीचे तात्पर्य असे की, माणसाने एकाच देवाची निस्सीम भक्ती करावी, असे स्वामी म्हणाले.

चातुर्मासारंभ: जीवनशैली, ऋतुचक्राशी निगडीत सात्विकतेचा आरोग्यदायी काळ

एकदा स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रपंचातील अडचणींनी, समस्यांनी, त्रासांनी गांजलेला असतो. स्वामी भक्ती करूनही त्रास काही केल्या संपत नाही, म्हणून शेवटी तो ज्योतिषाकडे जातो. ज्योतिषी ग्रहांचा त्रास असल्याचे सांगतो आणि यावर उपाय म्हणून ग्राम देवतेच्या पालखीचे दर्शन घेण्याचा सल्ला देतो. स्वामी नेमकी त्याच दिवसाची कार्य जबाबदारी श्रीपादवर सोपवतात. श्रीपाद स्वामींकडे पालखी दर्शनसाठी जाण्याची परवानगी मागतो. परंतु, स्वामी चक्क नकार देतात. श्रीपादचे मन अत्यंत विचलित होते. पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत, असे समजून श्रीपाद आणि भुजंग हे सेवेकरी पालखी दर्शनासाठी गुपचूप पळ काढतात. 

पालखी दर्शनासाठी जाताना श्रीपाद रस्त्यात आपली मोल्यवान स्वर्णमुद्रिका भुजंगकडे सांभाळायला देतो. भुजंग ती हातात ठेवतो. पालखीवर फुलांचा वर्षाव करताना मुद्रिकाही भिरकावली जाते. ही बाब भुजंगच्या लक्षात येत नाही. पालखी गेल्यावर मुद्रिका हातात नसल्याचे त्याच्या लक्षात येते. खूप शोध घेऊनही मुद्रिका मिळत नाही. स्वामी आज्ञेचे उल्लंघन झाले म्हणून हा प्रकरण घडला, असे मानून ते स्वामींना शरण जातात.

सर्वप्रथम स्वामी त्या दोघांची चांगली हजेरी घेतात. शेवटी स्वामींना दोघांची दया येते आणि मुद्रिका मिळेल विश्वास ठेवा असे स्वामी सांगतात. ती मुद्रिका रस्त्यावर पडलेली एका व्यक्तीला सापडते. तो ती उचलणार इतक्यात दुसरा उचलतो. यावरून दोघांचे भांडण जुंपते. अखेरीस ते दोघे स्वामींकडे न्यायनिवाड्यासाठी येतो. श्रीपादला त्याची मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो.

आयुष्याच्या सापशिडीत फासे आपल्याबाजूने कसे पाडायचे? सांगताहेत ज्ञानेश्वर माऊली!

स्वामी म्हणतात की, अरे गुरु असताना तू त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस. गेला तर गेला गुरु आज्ञेचे उल्लंघन केलेत. अरे! गुरुचे ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरुकडे धावत येतात. शिष्याने गुरुशी कायम एकनिष्ठ असावे. गुरुवर नेहमी विश्वास ठेवावा. कितीही संकट आली तरी त्याची कसं सोडू नये. संकटे ही पूर्व कर्मामुळे येतात आणि त्यावेळेला जर गुरुची कास सोडली तर व्यक्तीच्या समस्येत आणखीनच भर पडते. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते. तसेच संकटातून लवकर सुटका होण्याचे मार्ग अधिक लवकर प्रशस्त होतात.
 

Web Title: guru purnima 2021 swami samarth maharaj says that always be loyal to sadguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app