शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Guru Pradosh 2025: शिव तथा स्वामी समर्थांच्या कृपाप्राप्तीसाठी गुरु प्रदोषावर राशीनुसार करा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:46 IST

Guru Pradosh 2025: १० एप्रिल रोजी गुरु प्रदोष आहे, हे व्रत कर्जमुक्ती तसेच आर्थिक लाभ देणारे आहे, त्यासाठी राशीनुसार दिलेले उपाय करा.

सर्व दोषातून मुक्त करणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत, हे व्रत दर महिन्यातील त्रयोदशी तिथीला केले जाते. या महिन्यात १० एप्रिल २०२५ रोजी गुरुवारी प्रदोष आल्यामुळे हे व्रत गुरु प्रदोष (Guru Pradosh 2025) म्हणून केले जाईल. या दिवशी राशीनुसार कोणते उपाय केले असता कर्जमुक्ती तसेच आर्थिक अडचणी दूर होतात ते जाणून घेऊ. 

प्रदोष व्रत हे ज्योतिष शास्त्रात अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते.  प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. 

गुरु प्रदोष निमित्ताने आपण शिव उपासने बरोबरच गुरु तथा श्री स्वामी समर्थ उपासना देखील केली पाहिजे आणि पुढे दिलेल्या गोष्टी राशीनुसार भोलेनाथाला अर्पण केल्या पाहिजेत. 

मेष: मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराला चंदनाचे गंध लावावे आणि 'ओम नमः शिवाय' मंत्रजप १०८ वेळा करावा. 

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध आणि पवित्र धागा अर्पण करावा. महादेवाचा श्लोक म्हणून तो धागा उजव्या मनगटाला बांधावा. 

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करावे.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताला भगवान शंकराला बेल आणि पांढरी फुलं अर्पण करून शिवजप करावा. 

सिंह : सिंह राशीच्या लोकांनी या तिथीला महादेवाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 

कन्या : कन्या राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालावा.

तूळ : तूळ राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराला मध, पांढरे चंदन आणि बेलाचे पान अर्पण करावे.

वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी या शुभ मुहूर्तावर भोलेनाथांना लाल धागा अर्पण करावा आणि प्रसाद रुपी आपल्या उजव्या मनगटावर बांधून घ्यावा. 

धनु: धनु राशीच्या लोकांनी या शुभ दिवशी भगवान शंकराला केशर मिश्रित जल अर्पण करावे.

मकर : मकर राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाला निळी फुले आणि शमीची पाने अर्पण करावीत.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी या तिथीला भगवान शंकराला काळे तीळ अर्पण करावेत.

मीन: मीन राशीच्या लोकांनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना नागकेसरचे फूल अर्पण करावे, ते मिळत नसल्यास कोणतेही पांढरे फुल अर्पण करावे. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यPuja Vidhiपूजा विधीshree swami samarthश्री स्वामी समर्थ