>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
नेहमीच्या म्हणजेच सामान्य गतीने न जाता जेव्हा एखादा ग्रह वेगाने दुसर्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या गतीला “अतिचारी'' गती म्हणून संबोधले जाते. सध्या गुरुचे भ्रमण हे अतिचारी गतीने आहे. म्हणूनच अंदाजे १२ महिने एका राशीत राहणाऱ्या गुरु महाराजांनी आपले मिथुन राशीतील सिंहासन ५ महिन्यातच हलवले आहे. तसेच आता ते १८ ऑक्टोबर रोजी कर्क ह्या त्यांच्या उच्च राशीत प्रवेश करणार आहेत. कर्क ही गुरूची उच्च राशी आहे. मूळ पत्रिकेत गुरु कर्क राशीत असेल आणि चंद्र सुद्धा सुस्थितीत असेल तर गुरूची उच्च फळे अनुभवायला नक्कीच मिळतात.
गुरु हा मोक्षाचा कारक आहे. त्याचसोबत ज्ञान, शब्द, सदाचार, व्यासंग, विवाह, मानसन्मान, धर्म अध्यात्म, उपासना, जपताप्य सुद्धा गुरु देतो. कालपुरुषाच्या कुंडलीत गुरूच्या राशी ९ व १२ ह्या भावात येतात त्यातील ९ व भाव धर्म त्रिकोण आणि १२ वा भाव मोक्ष त्रिकोणात येतो. गुरूच्या अतिचारी गतीचा जनमानसावर तसेच अखंड विश्वावर परिणाम होतो. आपणही अनेकदा घाई घाईत जात असताना एखादी गोष्ट घरी विसरून जातो, मग पुन्हा मागे येऊन ती पूर्ण करून पुढे जातो, अगदी त्याचप्रमाणे गुरु अतिचारी गतीने पुढे केल्यावर पुन्हा अपूर्ण राहिलेल्या कामांसाठी मागे येतो म्हणजेच त्याची गती वक्री होते. अर्धवट काम संपवून पुन्हा मार्गस्थ म्हणजेच पुढे जातो. ह्याचा परिणाम आपला व्यवसाय, नोकरी, आर्थिक, मानसिकता, नातेसंबंध, विचार, प्रकृती होतो.
गुरूचा अतिचारी काळ: गुरु महाराज कर्क राशीत १८ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर पर्यंत राहणार असून पुन्हा ते मिथुनेत प्रवेश करतील. त्यात ११ नोव्हेंबरला गुरु वक्री सुद्धा होणार आहे. १ जुनला पुन्हा गुरु कर्क राशीत प्रवेश करेल.
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
मीन राशीत येणारा गुरु हा अत्यंत शुभ फळे देणारा असेल. लग्नेश गुरु पंचम भावात अध्यात्मातील रुची साधना, तंत्र मंत्र ह्यात सहभाग होईल. मीन राशी च्या लोकांना उपासना, अध्यात्मात प्रगती करणारा हा गुरु आहे. हा गुरु दशमेश आणि लग्नेश असल्यामुळे नोकरीत बदल आणि वृद्धी देईल. मानसिकता उत्तम होईल. सत्संग, व्यासंग वाढेल. मीन लग्न आणि राशीच्या लोकांनी ह्या काळात अधिकाधिक उपासना करून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करावा.
बारा राशींवर गुरुचा प्रभाव :
कुंभ राशीसाठी हे गोचर षष्ठ भावात असल्यामुळे कोर्ट केसेस, पोटाचे आजार किंवा वजन वाढणे. गुरूला षष्ठ भाव फारसा चांगला नाही. प्रोपर्टीसाठीचे वाद वाढतील. मकर राशीसाठी गुरु तृतीय आणि व्यय भावाचा कारक आहे. गोचर सप्तम भावात असल्यामुळे जोडीदाराशी काहीतरी मतभेत वाद होऊ शकतो. तृतीयेश असल्यामुळे विवाहाचे योग ओळखीतून होतील. व्ययेश असल्यामुळे परदेशगमन सुद्धा होईल. तूळ राशीसाठी गुरु इष्ट ग्रह नाही. षष्ठ भावाचा अधिपती उच्चीचा होईल, त्यामुळे बरोबर काम करणारे काही प्रश्न निर्माण करतील. नोकरी व्यवसायात अनेक प्रश्न निर्माण होतील, मेहनत वाढवावी लागेल. मेष लग्नासाठी हे गोचर शुभ असेल. चतुर्थातून गुरुचे भ्रमण उत्तम आहे. चतुर्थाची दशा असेल तर परदेशी असलेली मंडळी घरी परत येण्याची शक्यता आहे किंवा बाहेर जाण्याचीही शक्यता. भाग्येश चतुर्थात असल्यामुळे राजयोग आहे. शिक्षण उत्तम. सर्व सुखांची प्राप्ती, धनलाभ, भौतिक सुखांचीही प्राप्ती होईल. वृश्चिक लग्नासाठी गुरु हा लक्ष्मी स्थानांचे अधिपत्य दर्शवतो, त्यामुळे भाग्यातून होणारे उच्च गुरुचे गोचर चांगलेच जाईल. हे गोचर शुभ परिणाम देणारे ठरावे, यासाठी साधना आणि उपासनेसाठी उत्तम आहे. धन, पैसा मिळवण्यासाठी चांगला काळ आहे. गुरु पंचम दृष्टीने लग्नाला पण बघत असल्यामुळे आत्यंतिक शुभ काल आहे. कर्क लग्नासाठी गुरु षष्ठ भाव आणि भाग्येश आहे. पण षष्ठेश लग्नात उच्च हा तब्येतीच्या कुरबुरी देऊ शकतो त्यामुळे खानपान सांभाळावे लागेल. आपले वजन वाढणार नाही ह्याकडे लक्ष्य द्यायला लागेल. भाग्येश असल्यामुळे धार्मिक यात्रा संभवतात. साधनेसाठी उत्तम काळ, फक्त तब्येतीकडे दुर्लक्ष नको.सिंह लग्नासाठी गुरु हा महत्वाचा ग्रह पंचमेश आणि अष्टम भावाचा अधिपती असून व्यय भावात गोचर करणार आहे. मुलांना परदेशी जाण्यासाठी शिक्षणासाठी उत्तम काळ, पैशाची योग्य गुंतवणूक करणे आवश्यक आहे तसेच अनाठायी होणारा खर्च वाचवणे सुद्धा महत्वाचे आहे. साधना उपासना वाढवणे . पैशाचा व्यय न होऊ देणे हे महत्वाचे आहे. कुठल्याही ग्रहाचे गोचर भ्रमण आणि त्याचे परिणाम हे आपल्या मुळ पत्रिकेतील त्या ग्रहाच्या अवस्थेवर अवलंबून असते, त्यामुळे प्रत्येक पत्रिकेला त्याचे फळ एकसारखे नसून वेगवेगळे मिळते अर्थात त्यात मुख्य दशा सुद्धा पहाव्या लागतात. ज्यांना गुरूची दशा किंवा अंतर्दशा आहे त्यांना ह्याचा विशेष फायदा आहेच पण अर्थात पुन्हा लग्न सुद्धा महत्वाचे आहे.
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
गुरु हा आयुष्यातील अध्यात्म, धर्म व्यासंग ह्या सर्वाचा मुख्य कोश आहे. त्यामुळे बाराही राशीच्या लोकांनी पुढील काळात आपले जप नामस्मरण साधना दुप्पटीने वाढवावी आणि ह्या उच्चीची वस्त्रे परिधान केलेल्या गुरूसमोर नतमस्तक व्हावे. साधनेचे पुण्य आपल्या पदरात टाकण्यास गुरु समर्थ आहेच. गुरु हा मुळातच नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि त्याचे उच्चीचे होणे हे धर्म , साधना , नामस्मरण ह्यासाठी उत्तम असेल. गुरु आपल्याला घडवत असतात , आपले जीवन अनेक अनुभवातून योग्य दिशेला नेणाऱ्या ह्या गुरुचे उच्च होणे म्हणजे आपल्या साधनेला परिपक्व होण्यास मदत आहे. ह्या संधीचा आपण उत्तम उपयोग करून घेणे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.
सोमवारी दुपारनंतर गुरूचेच पुनर्वसू नक्षत्र आहे. त्यामुळे त्या दिवशी कुठल्याही साधनेस सुरवात केली, तर ती पुन्हा पुन्हा होईल ह्यात दुमत नसावे. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थांना तसेच तुमच्या आमच्या जीवनातील इतर सर्वच गुरुना साष्टांग सादर प्रणाम. हा गुरूबदल आपल्या सर्वाना आयुष्यातील आनंदाच्या यशाच्या समृद्धीच्या शिखरावर नेणारा, तसेच यश, समृद्धी, संपन्नता प्राप्त करन देणारा ठरुदेत हीच प्रार्थना.
कुठलीही उपासना म्हणजे आपल्या सद्गुरूंच्याप्रती आपला भाव, श्रद्धा , भक्ती रुपी सेवा समर्पित करण्याचा अनुभव जो आपल्याला समाधान मिळवून देतो. भक्ती असेल, अंतर्मानापासून कळकळ असेल, तर खात्रीने प्रचीती न मागताच मिळत. सर्व कार्य सिद्धीस नेण्यास ते समर्थ आहेत. ग्रंथ वाचन , प्रदक्षिणा, नामस्मरण, दान काहीही करा पण करा. आयुष्य त्यांच्या चरणाशी समर्पित करा. खालील कुठलीही उपासना किंवा तुमची नित्य उपासना करत राहावी.
नामस्मरण, तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, संक्षिप्त गुरुचरित्र , श्री गुरु चरित्र , श्री गजानन विजय पोथीचे नित्य पठण, इत्यादी
संपर्क : 8104639230
Web Summary : Jupiter's accelerated transit to Cancer on October 18 brings a period of spiritual growth and prosperity. This transit favors those with Jupiter favorably placed in their birth chart, especially for मीन (Pisces) rashi individuals. Focus on devotion and reap rewards until December, enhancing spiritual practice and seeking blessings.
Web Summary : 18 अक्टूबर को कर्क राशि में गुरु का तीव्र गोचर आध्यात्मिक विकास और समृद्धि का समय लाता है। यह गोचर उन लोगों के लिए अनुकूल है जिनकी कुंडली में गुरु अनुकूल स्थिति में है, खासकर मीन राशि के व्यक्तियों के लिए। दिसंबर तक भक्ति पर ध्यान दें और आध्यात्मिक अभ्यास बढ़ाएं।