शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Gupta Navaratri 2025 : कामाख्या मंदिरात होत आहे तांत्रिकांची गर्दी कारण सुरु झाली आहे आषाढ गुप्त नवरात्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:54 IST

Gupta Navaratri 2025 : यंदा २६ जून रोजी आषाढ गुप्त नवरात्र सुरु झाली असून ४ जुलै रोजी समाप्ती आहे; तांत्रिक विद्या करणाऱ्यांसाठी आहे विशेष महत्त्व; सविस्तर वाचा!

>> योगेश काटे, नांदेड 

हिंदु धर्मात शक्तीला अर्थात स्त्री  शक्तीला विविध  रुपात आदराचे स्थान आहे. आई ,बहीण, पत्नी म्हणून पण 'मातृ देवो भव' हे फक्त आपल्याच हिंदु संस्कृतीत आहे. आपल्याकडे एका वर्षात चार नवरात्र असतात. चैत्र, आषाढी,  शारदीय व माघी! त्यापैकी आषाढी व माघी हे नवरात्र गुप्त नवरात्र म्हणून शाक्त व तंत्रशास्त्रात महत्व नमुद केले जाते. 

आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र

शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत गुप्त नवरात्र साजरी केली जाते. या नऊ दिवसांत, आदिशक्ती माता दुर्गा आणि दहा महाविद्यांची पूजा केली जाते. याशिवाय, विशेष कार्यात यश आणि सिद्धी मिळविण्यासाठी उपवास केला जातो. गुप्त नवरात्र ही तांत्रिक उपासकांची नवरात्र म्हणूनही परिचित आहे. या काळात आसाम राज्यातील गुवाहाटी मधील माता कामाख्या मंदिरात मोठी गर्दी होते.  गुप्त नवरात्रीत, माता  दुर्गेच्या नऊ रूपांसह, दहा महाविद्यांची गुप्त पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता काली, दुसऱ्या दिवशी माता तारा, तिसऱ्या दिवशी माता त्रिपुरा सुंदरी, चौथ्या दिवशी माता भुवनेश्वरी, पाचव्या दिवशी माता चिन्नमस्तिका, सहाव्या दिवशी माता त्रिपुरी भैरवी, सातव्या दिवशी माता धुमावती, आठव्या दिवशी माता त्रिपुरा सुंदरीची पूजा केली जाते. याशिवाय नवव्या दिवशी कमला माँ ची पूजा करुन गुप्त नवरात्रीच्या उत्सवाचा समारोप होतो. 

गुप्त नवरात्रीमध्ये विशेषतः तंत्र कार्याची संबंधित उपासक देवीची विशेष पूजा करतात. गुप्त नवरात्रीत केलेल्या साधनेमुळे मोक्षप्राप्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. आध्यात्मिक विकास आणि देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी गुप्त नवरात्रीमध्ये होणारी देवीची पुजा महत्त्वाची मानली जाते. आषाढी गुप्त नवरात्रात वराही देवीची पुजा दक्षिण भारतात केले जाते. ही वराही देवी सप्तमातृका पैकी एक आहे. 

शाक्त पंथामध्ये व तांत्रिक संघांमध्ये, सामान्यत: सप्तमातृका पूजल्या जातात. तरीही काहिठिकाणी आठ मातृकांचा (अष्टमातृका) समुह देखील सापडतो. दक्षिण भारतात सप्तमातृकाची उपासना प्रचलित आहे, तर अष्टमातृका नेपाळमध्ये पूजल्या जातात. काही विद्वानांच्या मते ह्या शैव देवी आहेत. सात देवींचा एक समूह आहे. यात आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेय पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री, वराह अवतारापासून वराही तर देवीपासून चामुंडा, गणेशापासून विनायकी अशी शक्ती उत्पन्न झाली. काही ठिकाणी चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा) देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतो. अशा वेळी त्यांना अष्टमातृका असे म्हणतात. मार्कंडेय पुराण देवीमाहात्म्य किंवा दुर्गा सप्तशती, अग्नि पुराण, मत्स्य पुराण, वामन पुराण, वराह पुराण, कूर्म पुराण, सुप्रभेदागम व इतर आगम, वराहमिहिरलिखित “बृहत्संहिता” विष्णूधर्मोत्तर पुराण, महाभारत इ.अशा अनेक धार्मिक ग्रंथात मातृकांचा उल्लेख येतो. वराहपुराणानुसार मातृकांची संख्या आठ आहे. 

वराही : 

वराही किंवा वैराली हे वराहाचे सामर्थ्य आहे, विष्णूचे तिसरे आणि वराहयुक्त शीर. तिच्याकडे दंड किंवा नांगर, बोकड , वज्र किंवा तलवार आणि पानपत्र आहे. कधीकधी ती घंटा, चक्र, चामर (याकची शेपटी) आणि धनुष्य घेऊन जाते. तिने इतर दागिन्यांसह कारंडे मुकुट नावाचा मुकुट घातला आहे.

असे स्वरूप असणाऱ्या वराही देवीची गुप्त नवरात्र सुरु आहे, तिचे स्मरण, पूजन करूया आणि आपणही शक्तीचे उपासक होऊया. 

ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण