शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Gauri Puja 2023: २१ सप्टेंबर रोजी गौरी आवाहनाचा मुहूर्त आणि सविस्तर विधी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 09:00 IST

Gauri Pujan 2023: भाद्रपदात गणपती पाठोपाठ गौरीचे आगमन होते, तिचे माहेरपण करताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून वाचा ही माहिती. 

भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरु आहे ना, जणू काही हे तपासायला ती येते. तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाट माट आनंदात केला जातो. मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते. त्या सोहळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

Gauri Puja 2023: भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षरात गौरी आवाहन केले जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसावे, हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत.

काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण. परंतु प्रचलित कथेनुसार, माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे. म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती…

पद्मपुराणानुसार, समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती. लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते. एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते. ती नेहमी कमळावर विराजमान असते. पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते. 

पौराणिक मान्यतेनुसार, राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता. तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात. गौरीच्या पूजेने दु:ख दूर होते, दुर्दैव नाहीसे होते, दारिद्र्य दूर होते. मन प्रसन्न होते. 

गौरीच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त: २१ सप्टेंबर रोजी दुपारी १४. १६ मिनिटांनी सप्तमी सुरू होईल, त्यानंतर दुपारी ३. ३५ पर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे. 

ज्येष्ठा गौरी पूजन तिथी : २२ सप्टेंबर -ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त : दुपारी १२ च्या आधी गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा. 

ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी : २३ सप्टेंबर – ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : सकाळी ९ ते दुपारी २. ५६ मिनिटांपर्यंत

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी