Ganga Dussehra 2023: २० मे पासून 'गंगा दशहरा' उत्सवाची सुरुवात; तत्पूर्वी दुरुस्त करा 'ही' एक चूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 11:40 IST2023-05-19T11:39:51+5:302023-05-19T11:40:46+5:30
Ganga Dussehra 2023:गंगा दशहरा अर्थात गंगा मातेचा उत्सव; आपल्या देवघरातही ती विराजमान असतेच, फक्त तिच्याशी संबंधित या नियमांची शहनिशा करून घ्या!

Ganga Dussehra 2023: २० मे पासून 'गंगा दशहरा' उत्सवाची सुरुवात; तत्पूर्वी दुरुस्त करा 'ही' एक चूक!
गंगा पृथ्वीवर अवतरली तो दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. यंदा २० मे पासून गंगा दशहरा सुरु होत आहे. पापांचा नाश करणाऱ्या गंगा नदीला सनातन धर्मात अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. गंगेत स्नान करणारी व्यक्ती पावन होते अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात गंगाजलाचा वापर केला जातो. तसेच मृत्युमुखी पडलेल्या किंवा मृत व्यक्तीच्या तोंडात पापक्षालन व्हावे म्हणून अखेरचे गंगाजल घातले जाते. त्यामुळे बहुतेक हिंदू घरात गंगाजल ठेवले जाते.
>> गंगेचे पावित्र्य जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी पुढील चुका टाळा-
>> स्नान केल्याशिवाय गंगा जलाला कधीही स्पर्श करू नका. देहाची शुद्धता महत्त्वाची!
>> मांस आणि मद्य सेवन केले असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नका. अन्यथा पाप लागते.
>> देव्हाऱ्यात गंगाजल ठेवताना तिथे स्वच्छता राखा.
>> गंगाजल ठेवण्यासाठी घरातील सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य कोपरा. ही बाजू देवांची बाजू मानली जाते.
>> प्लास्टिकच्या बाटलीत गंगाजल कधीही ठेवू नका. प्लॅस्टिक हे अशुद्ध असून त्यामध्ये जास्त काळ गंगाजल ठेवल्याने त्यात विषारी रसायने होतात. गंगाजल नेहमी पितळी, तांबे किंवा चांदीच्या भांड्यात ठेवणे चांगले.
>> गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका. रात्रीच्या वेळीही येथे मंद प्रकाशाची व्यवस्था ठेवा.
>> घरात सोहेर किंवा सुतक असेल तर गंगाजलाला स्पर्श करू नये. बाहेरील अन्य व्यक्तीला तसेच नातेवाईकांना गंगाजल शिंपडून घरशुद्धी करण्यास सांगावे!