शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Utsav 2021: श्रीगणेश चतुर्थी: कधीपासून सुरू होणार गणेशोत्सव? पाहा, परंपरा आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:28 IST

Ganesh Utsav 2021 Date: यंदा गणेशोत्सवाची सुरुवात कधी होणार आहे? श्रीगणेश चतुर्थी, पुराणातील त्याबाबतचे उल्लेख यांबाबत जाणून घेऊया...

मराठी वर्षात चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील दुसरा महत्त्वाचा महिना म्हणजे भाद्रपद. जसे श्रावण महिना पूर्वी ‘नभस्’ या नावाने ओळखला जात असे, तसे भाद्रपद महिन्याचे वैदिक नाव नभस्य असे आहे. श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले आहे. अगदी याचनुसार, या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र पूर्वा किंवा उत्तरा भाद्रपदा नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला भाद्रपद हे नाव दिले आहे. भाद्रपद महिना म्हटला की, केवळ आणि केवळ आठवतो तो गणेशोत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. महाराष्ट्रासह बहुतांश घरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. घरगुती गणपतीप्रमाणेच मंडळांमध्येही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाची सुरुवात कधी होणार आहे? श्रीगणेश चतुर्थी, पुराणातील त्याबाबतचे उल्लेख यांबाबत जाणून घेऊया... (ganesh chaturthi 2021 date)

श्रीगणेश चतुर्थी: शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१

भाद्रपद चतुर्थी प्रारंभ: गुरुवार, ९ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ १२ वाजून १८ मिनिटे.

भाद्रपद चतुर्थी समाप्ती: शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी रात्रौ ९ वाजून ५८ मिनिटे. 

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे रुढ असल्यामुळे पार्थिव गणेशाची स्थापना करण्याचा दिवस तसेच गणेशोत्सवाची सुरुवात शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी होईल, असे सांगितले जात आहे. आताच्या काळात परदेशातही अनेकविध ठिकाणी पार्थिव गणेश पूजन करून गणेशोत्सव साजरा केला जातो. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून, राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Ganesh Utsav 2021 Date)

इच्छाशक्ती प्रबळ करायची आहे? रोज एक तास मौन पाळा; जाणून घ्या अधिक फायदे!

गणेश पूजनाची प्राचीन परंपरा

आपल्याकडे पार्थिव गणेश पूजनाची परंपरा सुमारे ५ हजार वर्षांपासून म्हणजेच महाभारत काळापासून चालत आल्याची मान्यता असल्याचे सांगितले जाते. महर्षी व्यासांनी सांगितलेले महाभारत गणपतीने लिहून काढले. त्यानंतर पार्थिव गणेश पूजनाची परंपरा रुढ झाली. कालांतराने ती प्रचलित झाली, असे सांगितले जाते. (Ganesh Utsav tradition)

तुम्हांला स्वप्नात महादेव शिवशंकरांचे दर्शन झाले? पाहा, यामागील नेमका अर्थ व मान्यता

श्रीगणेश चतुर्थीचे व्रत

वास्तविक पाहता मुख्य गणेश चतुर्थीचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत पार्थिव गणेशपूजा करावी, असे व्रत आहे. हे व्रत संपूर्ण महिनाभर करणे शक्य नसल्यास किमान भाद्रपद चतुर्थीला पार्थिव पूजा करावी, असे शास्त्र सांगते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाला खिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. (shree ganesh chaturthi vrat 2021)

देव-दानवांनी केलेले समुद्रमंथन भारतात नेमके कुठे झाले? पाहा, मान्यता आणि काही अद्भूत तथ्ये

श्रीगणेश चतुर्थी मान्यता

प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी सिद्धिविनायकी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. तर भाद्रपद महिन्यात येणारी शुद्ध चतुर्थी महासिद्धिविनायकी चतुर्थी मानली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे महात्म्य अधिक असते. याच तिथीला वरद चतुर्थी किंवा शिवा असेही म्हटले जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. गणेश चुतर्थी दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो. श्रीकृष्णावर या दिवशी घडलेल्या चंद्रदर्शनाने स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता, अशी मान्यता आहे. (ganeshotsav significance)

रुद्राक्षाचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहितीयेत का? पाहा, धारण करण्याचा योग्य विधी व महात्म्य

श्रीगणेश जन्माचा उत्सव

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे. चतुर्थी तिथी श्रीगणेशाची अत्यंत प्रिय तिथी आहे. चतुर्थी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती यांपलीकडील तुरीया अवस्था होय. तेच जीविताचे परमाध्य, असे मानले जाते. थोरले माधवराव पेशवे यांनी गणेश चतुर्थीचा उत्सव सार्वजनिकरित्या शनिवार वाड्यात सुरू केला. यानंतर लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक उत्सव समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला भव्य स्वरुप दिले, असे सांगितले जाते.  

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGaneshotsavगणेशोत्सव