Ganesh Puja: सहा महिन्यात लाभ देणारे प्रभावी गणेश स्तोत्र आणि गणेश स्थानाचा महिमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 07:05 IST2025-06-17T07:00:00+5:302025-06-17T07:05:02+5:30

Ganesh puja: मंगळवारी आपण गणेश पूजा करतो, त्यानिमित्ताने या प्रभावी स्तोत्राचा परिचय करून घ्या आणि त्यानिमित्ताने त्यात नमूद केलेली गणेश स्थान जाणून घ्या.

Ganesh Puja: Effective Ganesh Stotra that provides benefits for six months and the glory of Ganesh Sthan! | Ganesh Puja: सहा महिन्यात लाभ देणारे प्रभावी गणेश स्तोत्र आणि गणेश स्थानाचा महिमा!

Ganesh Puja: सहा महिन्यात लाभ देणारे प्रभावी गणेश स्तोत्र आणि गणेश स्थानाचा महिमा!

आज मंगळावर. त्यानिमित्त गणेश उपसना घरोघरी गणेश स्तोत्र म्हटले जाते. काही जणांना संस्कृत स्तोत्र अवघड वाटत असल्याने ते 'साष्टांग नमन हे माझे' हे संकटनाशन स्तोत्राचे मराठी अनुवादित स्तोत्र म्हणतात. हे प्रासादिक स्तोत्र सलग सहा महिने एकाच ठराविक वेळेत पठण केल्यास इच्छापूर्ती होते असे स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे. तूर्तास या स्तोत्रात उल्लेख केलेल्या गणरायाच्या बारा स्थानांबद्दल जाणून घेऊया. 

प्रथमं वक्रतुण्ड च एकदन्तं द्वितीयकम् । 
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥ 
लम्बोदरं पंचमं च षष्ठ विकटमेव च। 
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥ 
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । 
एकादशम् गणपति द्वादशं तु गजाननम् ।।४।।

१. वक्रतुण्ड : मद्रास राज्यातील कननूरजवळ

२. एकदन्त: पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.

३. कृष्णपिंगाक्ष : मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.

४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.

५. लंबोदर : ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात. (१) रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात, (२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.

६. विकट : हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.

७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.

८. धूम्रवर्ण :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. २) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.

९.  भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.

१०. विनायक :- काशीक्षेत्रातील अन्नपूर्णामंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.

११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.

१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.

समर्थ रामदासस्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात.

Web Title: Ganesh Puja: Effective Ganesh Stotra that provides benefits for six months and the glory of Ganesh Sthan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.