शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2024: शनिवारी गणेश मूर्ती आणायची नाही? वाचा बाप्पा आणि शनीदेवाचे खास कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:30 IST

Ganesh Chaturthi 2024: शनिवार न कर्त्याचा वार असे म्हणतात, पण म्हणून शनिवारी गणेश मूर्ती आणायची नाही का? शास्त्र काय सांगते ते जाणून घ्या!

यंदा ७ सप्टेंबर रोजी शनिवारी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024)आहे. तिथून पुढे ११ दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा या दिवशी होणार असली, तरी बाप्पाची मूर्ती कोणत्या मुहूर्तावर, कोणत्या तिथीवर किंवा कोणत्या दिवशी घरी आणावी यावर शास्त्रात कोणतेही बंधन नाही. कारण बाप्पा हा स्वतः मंगलमूर्ती आहे. जे अमंगल असेल तेही मंगल करणारा आहे. मग त्याला दिवसाचे, तिथीचे बंधन तरी कसे असणार? तरीदेखील, ज्यांच्या मनात शनिवारी गणेश मूर्ती आणावी की नाही याबद्दल साशंकता असेल त्यांनी शनी देवाचे आणि बाप्पाचे नाते आधी समजून घेतले पाहिजे. जेणेकरून त्यांची शंका आपोआप दूर होईल.  

बाप्पाला विविध नावांनी संबोधले जाते. त्यातच एक नाव आहे वक्रतुंड! लोकांना वाटते वक्रतुंड म्हणजे ज्याचे तोंड वाकडे आहे तो, पण असा त्याचा अर्थ नसून ज्याच्याकडे वाईट वळणावर चालणाऱ्या लोकांचे तोंड वाकडे करण्याची क्षमता आहे तो, असा अर्थ आहे. याशिवाय या नावाशी एक कथा जोडलेली आहे. कोणती, ते जाणून घेऊ. 

गणपती बाप्पाच्या  निर्मितीची कथा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले. त्याला मुलासमान मानून द्वारपाल म्हणून उभे केले. त्याने शंकरांना गृहप्रवेश नाकारला. शंकरांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वतीला वाईट वाटले. ते मूल परत मिळावे म्हणून हट्ट केला. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार उत्तर दिशेला मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्राण्याचे शीर कापून बालकाला जोडण्यास सांगितले. उत्तर दिशेला छोट्याशा हत्तीचे मरणासन्न कलेवर पडले होते. महादेवाच्या गणांनी त्याचे शीर कापून आणले आणि महादेवांनी ते बालकाच्या शरीराला जोडले. गजाचे आनन म्हणजेच शीर जोडले गेल्याने त्या बालकाला गजानन ओळख मिळाली. 

Ganesh Chaturthi 2024: दीड दिवसात गणपती विसर्जन करण्यामागे काय आहे शास्त्रार्थ? वाचा!

या गजाननाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व देवी देवता आले. त्यांनी गणरायाचे कौतुक केले आणि भेट म्हणून आपल्याकडची शक्ती, आयुधं देऊन त्याला बलशाली केले. भेटायला आलेल्यांमध्ये शनी देवाचाही समावेश होता. परंतु शनी देव प्रत्यक्ष भेटीसाठी घाबरत होते. कारण शनी देवाची दृष्टी ज्याच्यावर पडते, त्याचा सर्वनाश होतो. परंतु गजाननाच्या भेटीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी माता पार्वतीने त्यांना सांगितले, शनी देवा तुम्ही प्रेमदृष्टीने गणरायाची भेट घेतली असता त्याला काहीच त्रास होणार नाही याची मला खात्री आहे. मातेने मनातील संभ्रम दूर केल्याने शनीदेवाने गणरायाची भेट घेतली. आणि आपल्याकडून गणरायाला भेट म्हणून वक्रदृष्टीची शक्ती दिली. ज्यायोगे वाईट किंवा वाम मार्गाला जो जातो त्याच्यावर बाप्पाची वक्र दृष्टी पडून त्याचा धडा मिळतो. 

अशी ही भेट मिळाल्याबद्दल गणरायाने शनी देवाचे आभार मानले आणि बाप्पाने शनी देवाचे काम सोपे केले. आहे की नाही छान वक्रतुंड नावाची जन्मकथा? 

Ganesh Chaturthi 2024: आपल्या वागणुकीतून बाप्पाचा अपेक्षाभंग होणार नाही याची गणेशोत्सवात घेऊया काळजी!

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपती 2024