शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

Food Astrology: तुमच्या राशीनुसार निवडा आहार; आयुष्य होईल निरोगी आणि सदाबहार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 11:43 IST

Food Astrology : ज्योतिषशास्त्राचीच आणखी एक शाखा म्हणजे खाद्य ज्योतिषशास्त्र; त्यात तुम्हाला राशिनुसार तुमच्या प्रकृतीला मानवेल अशी आहारपद्धती दिली जाते; वाचा.

लोकांना वाटते, की ज्योतिषशास्त्र हे केवळ आपले भूत, वर्तमान आणि भविष्य सांगते. परंतु, ज्योतिषशास्त्रात आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीतही अनेक बाबींचा समावेश असतो. अनेक समस्यांवर उपाय दिलेले असतात. तुमच्या राहणीमानापासून ते आहारशैलीपर्यंत सर्व गोष्टींचा ग्रहमानावर परिणाम होतो. तुम्ही सेवन करत असलेले अन्न, तुमच्या ग्रहस्थितींवर अनुकूल आणि प्रतिकुल परिणाम करतात. इथे आम्ही तुम्हाला 'फूड अ‍ॅस्ट्रॉलॉजी' अर्थात 'खाद्य ज्योतिषशास्त्र' याबद्दल माहिती देणार आहोत. ही माहिती वाचून तुम्ही तुमच्या राशीला अनुकूल आणि प्रभावी ठरणारे अन्न सेवन करू शकता. 

काय आहे खाद्य ज्योतिषशास्त्र?

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी विशिष्ट प्रकारच्या खाद्यसवयींशी जोडलेली असते. त्या सवयींचा तुमच्या जीवनशैलीवर प्रभाव पडतो. आपण सेवन करत असलेल्या अन्नाचा आपल्यावर योग्य प्रभाव पडावा, यासाठी ज्योतिषशास्त्राचा घेतलेला आधार, यालाच `खाद्य ज्योतिषशास्त्र' असे म्हणतात. कोणत्या राशीच्या लोकांनी काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही, यासंबंधी सर्व माहिती खाद्य ज्योतिषशास्त्रात दिलेली आहे. 

भोजनाचे प्रकार आणि प्रभाव

अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत, परंतु हवा, पाणी आणि भोजन यांशिवाय आपण जीवंत राहू शकणार नाही. त्या तीन गोष्टींपैकी हवा आणि पाणी मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागत नाही. मात्र, अन्न मिळवण्यासाठी धडपडावे लागते. तरच, आपण आपल्या आवडीचे अन्न निवडू शकतो. 

श्रीमद्भगवद्गीतेत भोजनाचे तीन प्रकार सांगितले आहेत-१. सात्विक २. राजस ३. तामसया तीनही प्रकारच्या भोजनांची विस्तृत माहिती आपण पौराणिक कथांमधून मिळवू शकतो. खाद्य ज्योतिषशास्त्रानेदेखील अन्न वर्गवारी करताना वरील तीन श्रेणींच्या अंतर्गत विभागणी केली आहे. शाकाहारी जेवणात सात्विक गुण असतात. तर मांसाहारी जेवणात तामस गुण असतात आणि ज्यांच्या जेवणात दोन्ही प्रकारांचा समावेश असतो, त्याला आहारात राजस गुण असतात. ज्याला आपण `तब्येतीत' खाणे असेही म्हणतो.

सात्विक आहार तुम्हाला आध्यात्म आणि शांतीमय जीवनाकडे नेईल, तर तामस आहार तुमची वृती अशांत, अस्थिर, हिंसक बनवेल. राजस आहार, ऐषारामी जीवनासाठी प्रवृत्त करेल. अर्थात तुमचे जन्मस्थान आणि भौगोलिक गोष्टी यावरही आहार रचना अवलंबून असते. परंतु, आपल्या प्रकृतीला मानवेल, अशा पद्धतीने आहारशैलीत बदल केला पाहिजे. 

राशीनुसार निवडा आपली आहारशैली : 

मेष : मसूर डाळ, बेसन, गहू यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. 

वृषभ : दही, दूध, तांदूळ यांपासून बनवलेले अन्नपदार्थ खावेत. 

मिथून : सर्व प्रकारच्या डाळी, गहू, हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. 

कर्क : दही, दूध, तूप, तांदूळ अशा पांढऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.

सिंह : तूर, मसूर डाळींचा, तांदूळाचा आहारात समावेश करावा.

कन्या : मूग, गहू, हिरव्या भाज्या फलदायी आहेत. 

तूळ : तांदूळ, दही, दूध यांपासून बनलेले पांढरे पदार्थ सेवन करावे. 

वृश्चिक : मसूर, बेसन, गहू यांचा आहारात अधिक समावेश करावा. 

धनु : तूर, चणा डाळ, गूळ हे पदार्थ लाभदायक.     

मकर : उडीद डाळीचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. 

कुंभ: ठराविक प्रमाणात तळलेले पदार्थ खावेत, तसेच उडीद डाळीचाही जेवणात समावेश करावा.

मीन : तूर आणि चणा डाळ लाभदायक.

टॅग्स :foodअन्नAstrologyफलज्योतिषHealth Tipsहेल्थ टिप्सZodiac Signराशी भविष्य