शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:09 IST

First Angaraki Sankashti Chaturthi 2026: २०२६ मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे.

First Angaraki Sankashti Chaturthi 2026: ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिःसीदसादनम्॥ इंग्रजी नववर्ष २०२६ ची सुरुवात झाली आहे. या नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ फलदायी योग जुळून आलेले आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण, पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतलेले आहे, ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी, यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपती उपासनांमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. २०२६ मधील पहिल्याच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते. कधी आहे पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी? या दिवशी गणपती उपासना कशी करावी? याबाबत जाणून घेऊया...

२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख

गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. आबालवृद्धांचे आराध्य,  सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपतीची शाश्वत कृपा लाभावी, यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रते करतात, त्यापैकी संकष्ट चतुर्थीचे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. 

१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा

२०२६ मधील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी

मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार, ०६ जानेवारी २०२६ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. 

संकष्ट चतुर्थीला अंगारक योग विशेष का मानला जातो?

अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की, 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात याचे संदर्भ आढळून येतात. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.

गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!

अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात?

- शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पाचे दर्शन घ्यावे.

- संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे. 

- मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक करणे शक्य नसतील, तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा. 

- गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते शुभ लाभदायक ठरू शकते. 

- गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.  -  गणपतीचा ‘ॐ गं  गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा.

- शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणपती स्तोत्र आवर्जून म्हणावे.

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : 2026's First Angaraki Sankashti Chaturthi: 3 Things for Bappa's Blessings

Web Summary : The first Angaraki Sankashti Chaturthi of 2026 falls on January 6th. Observing this day with Ganpati worship, offering jaswand flowers, modak or sweets, and reciting 'Om Gan Ganpataye Namah' brings blessings and removes obstacles, according to tradition. It's considered highly auspicious.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती 2025Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी