Maha Shivratri 2021: शिवपूजा करताना सर्वसामान्यपणे कोणते नियम पाळले जावेत, हे जाणून घ्या.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 21:25 IST2021-03-09T21:24:36+5:302021-03-09T21:25:02+5:30
Maha Shivratri 2021: मनोभावे शिवपूजा केली असता शिवकृपा लवकर प्राप्त होते.

Maha Shivratri 2021: शिवपूजा करताना सर्वसामान्यपणे कोणते नियम पाळले जावेत, हे जाणून घ्या.
शंकराला आपण भोळा सांब असे म्हणतो. शिवाय त्याचे एक नाव आशुतोष असेही आहे. आशुतोष म्हणजे पटकन संतुष्ट होणारा देव. म्हणून अनेक जण शिवपूजेला प्राधान्य देतात. तसे असले, तरी शिवपूजेतील काही नियम पाळण्याबद्दल शास्त्राने काही सूचना केल्या आहेत.
>>घरामध्ये दोन शिवलिंगाची पूजा करू नये.
>>भस्मधारण केल्याखेरीज शिवपूजेस आरंभ करू नये. तसेच शिवपूजा करताना गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि शुभ्र वस्त्र अवश्य परिधान करावे.
>>शिवपूजेत अभिषेकाच्या वेळी शिवास शंखोदकाने म्हणजे शंखातील पाण्याने स्नान घालू नये.
>>मंदिरातील मानवस्थापित शिवलिंगास शिव निर्माल्यापर्यंतच प्रदक्षिणा घालावी. स्वयंभू शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावी. घरातील शिवपूजेच्या वेळी स्वत: भोवती प्रदक्षिणा करावी.
>>शिवास केवडा व तुळस वाहू नये. परंतु विष्णुचरणवरील तुळस शिवाला प्रिय आहे. तसेच बेल, कुंद, कोरांटी व पांढरी कण्हेर शिवाला अत्यंतर प्रिय आहे. शिवपिंडीवर बेलाचे त्रिदल किंवा पंचदल अग्र आपणाकडे उपडे वाहावे.
>>मंदिरातील नंदीच्या वृषणावर डावा हात आणि शिंगांवर उजव्या हाताची तर्जनी व अंगठा ठेवून त्यातून शिवदर्शन घ्यावे.
उपरोक्त नियमांचे पालन करताना मनोमन भक्ती आणि आवड ठेवून पूजा करावी. भोळा सांबसदाशिव भक्ताची सेवा आनंदाने मान्य करून घेतो.