शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

लग्न जुळवताना मुला मुलीच्या कुंडलीत नेमके कोणते  ३६ गुण जुळवले जातात जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:50 IST

हिंदू विवाह पद्धतीत पत्रिका पाहिल्याशिवाय लग्नाची गाडी पुढे सरकत नाही. अशा वेळी कुंडलीत नेमके कोणते दोष गुण पाहिले जातात याची विवाहेच्छुकांनी माहिती करून घ्यावी!

हिंदू धर्मशास्त्रात ज्योतिष विद्येला महत्त्व असल्यामुळे शुभ मुहूर्त, जन्म कुंडली, लग्न कुंडली, ग्रहपीडा, उष्कर्ष, भविष्य, आजार आणि मरणोत्तर विधी या सर्व गोष्टींसाठी पंचांगाचा आधार घेतला जातो. याच आधारे आयुष्यातला मोठा निर्णय अर्थात लग्नाचा, त्यावेळेसदेखील कुंडली बघून लग्न जुळवले जाते. आजही अनेक घरांमधून कुंडली पाहून विवाह ठरवण्याला प्राधान्य दिले जाते. तर काही जण नकार कळवण्यासाठी कुंडलीचा आसरा घेतात. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आणि ज्याचा त्याचा विश्वास! परंतु इथे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, ते म्हणजे कुंडली जुळवताना ३६ चा आकडा आला कुठून? 

जिथे प्रेमविवाह होतात, तिथे ज्योतिषी कुंडली न पाहण्याचा सल्ला देतात. कारण दोघांनी एकमेकांना दोष गुणांसह स्वीकारूनच लग्नाचा निर्णय घेतलेला असतो. कुंडलीदेखील गुण दोष दर्शवते. पूर्वी व्यक्तीचा स्वभाव, दोष इ माहिती जाणून घेण्यासाठी पत्रिकेचा वापर होत असे. आताची पिढी सोशल मीडिया अकाउंट वरून एकमेकांची सखोल कुंडली शोधून काढते! विनोदाचा भाग सोडा, परंतु लग्न छान टिकावे, परस्पर संबंध जुळावेत, स्वभावाचे, मनाचे मिलन व्हावे या हेतूने कुंडली बघण्याला आजही लोकांची पसंती असल्याचे दिसून येते. 

पत्रिका जुळण्यासाठी किती गुण आवश्यक?वधू वराचे वैवाहिक जीवन सुखी समृद्ध असावे म्हणून ३६ पैकी निदान १८ गुण मिळवणे आवश्यक असते. यालाच आपण काठावर पास होणे असेही म्हणू शकतो. काही जणांचे ३६ गुणदेखील जुळतात आणि त्यांचे विवाह संपन्न होतात. १८ पेक्षा कमी गुण जुळणाऱ्या पत्रिकांचे मिलन होऊ शकत नाही असे नाही. परंतु जेवढे गुण जुळत नाहीत ते जुळवून घेण्याची तयारी दोहोंनी दर्शवली तर तोही विवाह यशस्वी होऊ शकतो. तशीही अनेक उदाहरणे आपल्याला आसपास दिसतील. पत्रिका जुळलेले असो नाहीतर न जुळलेले असो, लग्न झाल्यावर प्रेम, वाद, मौन, टोमणेबाजी, शेरेबाजी ओघाने आलीच. फक्त त्याकडे तुम्ही किती खिलाडू वृत्तीने नाते हाताळता यावर संसाराचे आयुर्मान दिसते. म्हणून पत्रिका मिलनाचा आग्रह!

पत्रिका मिलनात नेमके कोणते ३६ गुण तपासले जातात?लग्नाच्या वेळी कुंडली जुळताना अष्टकूट गुण दिसतात. यामध्ये नाडीचे ८ गुण, भकूतचे ७ गुण, गण मैत्रीचे ७ गुण, ग्रह मैत्रीचे ५ गुण, योनी मैत्रीचे ४ गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे २ गुण आणि वर्णाचे १ गुण जुळले का हे पाहिले जाते. अशा प्रकारे एकूण ३६ गुण आहेत.लग्नानंतर वधू-वर एकमेकांशी मैत्रीपूर्ण असावेत, संतती असावी, सुख, संपत्तीत वृद्धी व्हावी, दीर्घायुष्य लाभावे, यासाठी ही मुख्य चाचणी असते. 

टॅग्स :marriageलग्नAstrologyफलज्योतिष