अलीकडे सगळेच पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. तिथे सर्व शिक्षण इंग्रजी पद्धतीने दिले जाते, काही ठिकाणी भाषा इंग्रजी असते आणि सण, पद्धती हिंदू धर्माप्रमाणे साजऱ्या केल्या जातात. मात्र जे शिक्षण घरातून मिळायला हवे ते देण्यासाठी आजी-आजोबा नाहीत, आई बाबांना वेळ नाही, अशी स्थिती असल्यामुळे नवीन पिढीतली मुले आपल्या सण, उत्सवांपासून, मराठी महिन्यांपासून, तिथीपासून आणि त्याचे महत्त्व जाणून घेण्यापासून वंचित राहत आहेत. यासाठी नवनवीन माहिती घेऊन आपल्या आणि मुलांच्या ज्ञानात भर घालणे हा एकमेव मार्ग आहे. याबाबत नुकताच पाहण्यात आलेला व्हिडीओ आणि त्यात दिलेली माहिती जाणून घ्या.
आपले सगळे सण तिथीप्रमाणे(Indian Festival) येतात. एकूण तिथी सोळा आहेत. त्या प्रत्येक तिथीनुसार प्रत्येक महिन्यात येणारे सण आपण साजरे करतो, ते लक्षात ठेवले तर आपल्याला तिथी आणि मराठी महिने पाठ करणे सोपे जाईल.
बली प्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा : ऑक्टोबर/नोव्हेम्बरयम द्वितीया : कार्तिक शुद्ध द्वितीया : ऑक्टोबर/ नोव्हेम्बरअक्षय तृतीया : वैशाख शुद्ध तृतीया : एप्रिल/मे गणेश चतुर्थी : भाद्रपद शुद्ध चतुर्थी : ऑगस्ट / सप्टेंबर नाग पंचमी : श्रावण शुद्ध पंचमी : जुलै / ऑगस्ट चंपा षष्ठी : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी : नोव्हेंबर/ डिसेंबर रथ सप्तमी : माघ शुद्ध सप्तमी : जानेवारी / फेब्रुवारी गोकुळ अष्टमी : श्रावण वद्य अष्टमी : ऑगस्ट/ सप्टेंबर श्रीराम नवमी : चैत्र शुद्ध नवमी : मार्च / एप्रिल विजया दशमी : अश्विन शुद्ध दशमी : सप्टेंबर / ऑक्टोबर आषाढी एकादशी : आषाढ शुद्ध एकादशी : जून / जुलै गोवत्स द्वादशी (वसुबारस) : अश्विन शुद्ध द्वादशी : ऑक्टोबर / नोव्हेंबर धन त्रयोदशी : अश्विन शुद्ध त्रयोदशी : ऑक्टोबर / नोव्हेंबर नरक चतुर्दशी: अश्विन शुद्ध चतुर्दशी : ऑक्टोबर / नोव्हेंबर गुरु पौर्णिमा : आषाढ पौर्णिमा : जून / जुलै सर्वपित्री अमावस्या : भाद्रपद अमावास्या : सप्टेंबर/ ऑक्टोबर