संकष्ट चतुर्थी: समस्या संपतील, पूजेचे पूर्ण पुण्य मिळेल; बाप्पाला ‘ही’ एकच गोष्ट करा अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:43 IST2025-03-16T15:42:22+5:302025-03-16T15:43:45+5:30

Falgun Sankashti Chaturthi March 2025: गणपती बाप्पाची असीम कृपा लाभावी, यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करावा, असे सांगितले जाते.

falgun sankashti chaturthi march 2025 after ganesh pujan should offer this one thing to ganpati bappa to get relief from problems infinite timeless blessings and prosperity | संकष्ट चतुर्थी: समस्या संपतील, पूजेचे पूर्ण पुण्य मिळेल; बाप्पाला ‘ही’ एकच गोष्ट करा अर्पण

संकष्ट चतुर्थी: समस्या संपतील, पूजेचे पूर्ण पुण्य मिळेल; बाप्पाला ‘ही’ एकच गोष्ट करा अर्पण

Falgun Sankashti Chaturthi March 2025: सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे. अवघ्या काही दिवसांनी या मराठी वर्षातील सांगता होऊन नववर्षाला प्रारंभ होईल. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीला व्रतात पूजन करताना बाप्पाला काही गोष्टी अर्पण करणे अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे.

प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे, असे म्हटले जाते. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते.

सोमवारी संकष्टी चतुर्थीला महादेवांचे नामस्मरण, पूजन करावे

मराठी महिन्यातील शेवटची फाल्गुन संकष्ट चतुर्थी सोमवारी आली आहे. यामुळे गणपती पूजनासह महादेव शिवशंकरांचे आवर्जून नामस्मरण, पूजन, उपासना करावी, असे सांगितले जाते. गणपती बाप्पासह शंकराची अपार कृपा लाभू शकेल, शुभाशिर्वाद मिळू शकतात, असे सांगितले जाते. महादेव आणि पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते, हे सर्वश्रुत आहे. 

बाप्पाला ‘ही’ एकच गोष्ट करा अर्पण

गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. धार्मिक पुराणांमध्ये गणपतीला बुद्धीचा देवता मानले गेले आहे. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वदाचे एखादे फूल वाहावे आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते. 

|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||

Web Title: falgun sankashti chaturthi march 2025 after ganesh pujan should offer this one thing to ganpati bappa to get relief from problems infinite timeless blessings and prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.