शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:27 IST

मानवी जीवनातली निस्सीम प्रेमभावना

माणसाचे जीवन हे एका सुंदर प्रवासाने गुंफलेले असते. फक्त माणूस सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली पुरता दबून जात नवनवीन दुःखाची पेरणी करतो. मानवाच्या आयुष्यात क्रमाने येणाऱ्या बालपण, यौवन,गृहस्थ आणि वृद्धपणा ह्या चार अवस्था आहेत. पैकी पहिल्या तीन अवस्था जगताना माणूस उत्साहात असतो कारण त्या अवस्थात त्याच्या जीवनात रोज काहीना काही नवीन घडत असतं किंवा नवीन काहीतरी घडवण्याच्या उमेदीत तो असतो. तोपर्यंत त्याला जीवन जगायची असोशी असते. 

साठीच्या पुढे ज्याचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असतं तोही तसा उत्साहात असतो. कारण त्याला पूर्वी नोकरीमुळे मोकळा वेळ मिळालेला नसल्याने देशांतर्गत पर्यटन , परदेशवारी करायला वेळ मिळालेला नसतो पण आता त्याला ते शक्य असतं. हे सगळं पासष्टीपर्यंत उरकतं. मग मात्र रिकामा वेळ त्याला खायला उठतो. हळूहळू प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू होतात आणि मग गाडी हळूहळू उताराला लागते. उतरत्या वयात आरोग्याची साथ मिळेनाशी होते. तसेच हळूहळू घरातले महत्वही कमी होत जाते. मत विचारात न घेता परस्पर महत्वाचे निर्णय घेतले जातात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मनुष्य हळूहळू जीवनाला कंटाळू लागतो.. पण म्हणून काही जगणे सोडता येत नाही. आयुष्य आहे तोवर जगावेच लागते पण ती एक कंटाळवाणी यात्रा ठरते. शेवटीशेवटी तर कधी सुटका होईल असे वाटत राहते.

 जीवन उत्साहानं जगण्यासाठी माणसासमोर काहीतरी ध्येय,आव्हान असणे नेहमीच गरजेचे आहे. कारण आव्हानाची पूर्तता करण्यात माणूस गुंतून पडतो. पण म्हातारपणी माणसापुढे एकदम असे आव्हान कसे उभे राहील ? म्हणजे असे आव्हान कोणते ते हुडकण्याची तयारी जो पूर्वायुष्यात करेल त्याला उत्तरायुष्यात त्या आव्हानाचा सामना करण्यात वेळ चांगला गेल्यामुळे कंटाळा येणार नाही. उलट त्याचा उत्साह उत्तरोत्तर वाढता राहील. 

माणूस ही भगवंतांचीच निर्मिती असल्याने माणसाला आयुष्याचा कंटाळा येऊ नये यादृष्टीने स्वच्या स्वरूपाचा शोध हे आव्हान भगवंतांनी त्याच्यापुढे उभे केले आहे पण भगवंत ज्याप्रमाणे प्रकृतीत म्हणजेच त्यांच्याच मायाशक्तीत गुंतून पडून एकाचे अनेक झालेत त्याप्रमाणे मनुष्य हाही भगवंतांचा अंश असल्याने मोहमायेच्या जंजाळात गुंतून स्वतःचं मूळ स्वरूप विसरून स्वतःभोवतीची आवरणं वाढवत जातो. जीवनामध्ये जेवढ्या लवकर हा गुंता लक्षात येईल तितक्या तीव्रतेने मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल आणि तो गुंता सोडवण्यातला आनंद घेत घेत कधी अंतिम समय आला हे त्याचं त्यालाही कळणार नाही. अखेरपर्यंत तो स्वतःवर प्रेम करत जगण्यातला आनंद मिळवत जातो.

 स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेण्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जाते मग त्यात त्याला वाढतं वय , प्रकृती , समाजातील उपेक्षा या कशाचाही अडथळा जाणवत नाही आणि मग तो म्हणत राहतो या जन्मावर शतदा प्रेम करावे...!

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक