शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Early Marriage Tips: तरुणांनो, तुम्हालाही तुमची स्वप्नातली सावित्री लवकर मिळवायची असेल तर करा 'हे'उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:29 IST

Early Marriage Tips: काही जणांची गाडी शिक्षण, नोकरीनंतर अचानक लग्न या विषयापाशी येऊन थांबते. यासाठी ज्योतिष शास्त्राने मुलांसाठी सुचवलेले उपाय!

जोडीदाराला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. सती सावित्री सारखा उपास करतात, मनोभावे वडाची पूजा करतात. त्याचे फळ त्यांना मिळते. पण मुलांच्या बाबतीत असे विशिष्ट व्रत असल्याचे आपल्या ऐकिवात नाही. याचा अर्थ त्यांनी वाट बघत थांबून राहायचे का? वेळ वाया घालवायचा का? त्यांनाही उपासना करावीशी वाटत असेल तर नेमका मार्ग कोणता? याबद्दल ज्योतिष शास्त्र मार्गदर्शन करत आहे. 

वेळेत शिक्षण, वेळेत करिअर, वेळेत लग्न आणि पुढचा संसार सुरळीत व्हावा, अशी सर्वसामान्यपणे प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र काही जणांची गाडी शिक्षण, नोकरीनंतर अचानक लग्न या विषयापाशी येऊन थांबते. मुली स्तोत्रवाचन, जप, जाप्य इ. उपाय करतात. पण मुलांनी नेमके कोणते उपाय करायला हवेत हे कोणीच सांगत नाही. यासाठीच ज्योतिष शास्त्राने मुलांसाठी पुढील उपाय सुचवले आहेत. 

लग्नाला उशीर होण्यामागे किंवा वारंवार फसवणूक होण्यामागे कुंडलीतील ग्रह कमकुवत असू शकतात. मात्र त्यावर उपाय केले तर मनासारखा जीवनसाथी मिळणे अवघड जाणार नाही. जर तुम्हाला जोडीदार मिळत नसेल किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न ठरण्यात अडथळे येत असतील तर पुढे दिलेले उपाय सुरू करा. 

  • जर तुमचा जोडीदाराचा शोध संपत नसेल, तर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेमाचा वेणूनाद होईल आणि प्रेमाची बाधा दूर होऊन तुमची राधा तुम्हाला लवकरच सापडेल. 
  • एखाद्या मुलीवर तुमचे प्रेम आहे पण लग्न जुळून येण्यात अडथळे येत असतील तर एखाद्या उंचावरील देवीच्या देवस्थानात दर्शनाला जा. देवीला आपली समस्या सांगा आणि श्रीफळ अर्पण करून संसार मार्गी लागू दे अशी प्रार्थना करा. 
  • चांगला आणि प्रामाणिक जीवनसाथी मिळण्यासाठी भगवान शिव शंकराची आराधना करा. १६ सोमवारचा उपास सुरू करा. ते शक्य नसेल तर दर सोमवारी शिव मंदिरात जाऊन अभिषेक करा. भोलेनाथाची कृपा झाली तर तुम्हाला चांगला जोडीदार मिळून आयुष्य मार्गी लागेल. 
  • कुंडलीतील ग्रह दोषांमुळे विवाह ठरण्यात अडचणी येत असतील तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. दररोज ''ओम लक्ष्मी नारायण नमः'' या मंत्राचा जप करा. पुढच्या तीन महिन्यात तुमचे लग्न ठरले तर एखाद्या गरजू जोडप्याला अन्न तसेच पिवळ्या वस्त्राचे दान करा. 
  • प्रेम विवाह पार पडण्यात अडचणी येत असतील तर शनिवारी तसेच अमावस्येच्या दिवशी प्रियकर-प्रेयसीने भेटणे टाळावे. घरी लग्नाचा प्रस्ताव मांडायचा असेल तर शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मांडावा. घरातून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल. 
  • लग्न ठरेपर्यंत आणि ठरल्यावरही शक्य तेव्हा कृष्ण मंदिरात दर्शनाला जा. राधा कृष्णाची उपासना करा. शक्य झाल्यास स्वतःच्या हातांनी गुंफलेला हार किंवा एखादे फुल देवाला अर्पण करा. 
  • वरवर सोपे वाटणारे हे तोडगे तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळवून देईल. 
टॅग्स :marriageलग्नAstrologyफलज्योतिष