शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्योधनाचा उन्माद, अहंकार की अनैतिकता? नेमके काय होते त्याच्या 'अपयशाचे' कारण? श्रीकृष्णाने केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:48 IST

युद्धात जय-पराजय ठरलेला असतो, पण अपयशाचे कारण शोधले, सुधारले, तर तो खरा योद्धा; मात्र दुर्योधनाच्या बाबतीत काही वेगळेच झाले!

महाभारताचा नीट अभ्यास केला तर ते कालातीत असल्याचा अनुभव आपल्याला येतो. आपले रोजचे आयुष्य कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही आणि आपल्या सभोवताली असलेली माणसं कौरवांपेक्षा वेगळी नाहीत. फक्त उणीव भासते ती सखा श्रीकृष्णाची! त्याची साथ मिळेपर्यंत निदान त्यांनी या कथांमधून जो बोध दिला आहे त्याचे अवलोकन करूया आणि आपापल्या अपयशावर मात करत जीवनयुद्ध जिंकण्याचा प्रयत्न करूया!

दुर्योधन काय, की भीम काय दोघेही एकाच गुरुंचे शिष्य आणि एकापेक्षा एक बलवान. मात्र  दुर्योधन त्याच्या आसुरी शक्तीमुळे भीमापेक्षा किंचीत अधिकच श्रेष्ठ होता. परंतु, युद्धात भीमाशी दोन हात करताना त्याच्या वाट्याला पराभव आला. 

कणखर, शक्तीशाली, वज्रापेक्षा कठोर देहयष्टीच्या दुर्योधनाशी मुष्टियुद्ध करताना भीमाचे प्राण कंठाशी आले होते. तो सर्व शक्ती पणाला लावून दुर्योधनाला मारण्याचा प्रयत्न करत होता. परंतु उपयोग होईना. शेवटी भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करायला सांगितला. कारण, त्याच मांडीवर बसवण्यासाठी भर सभेत दुर्योधनाने द्रौपदीला खजिल केले होते. तो प्रसंग आठवून भीमाने जोरदार वार केला आणि दुर्योधन क्षणार्धात धारातिर्थी पडला. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दुर्योधनाला अंतिम समयी काहीतरी बोलायचे होते. तो श्रीकृष्णाकडे अंगुलीनिर्देष करून त्याला जवळ बोलवत होता. श्रीकृष्णांनी जाऊन दुर्योधनाला सावरले. त्याने हात जोडून श्रीकृष्णाला आपल्या पराभवाचे कारण विचारले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी स्वत:च्या पापांची कबुली द्यायची सोडून दुर्योधन पापांचा हिशोब विचारत होता, हे पाहून श्रीकृष्णाला हसू आले. त्यांनी त्याला त्याच्या तीन चूका सांगितल्या.

पहिली चूक, युद्धापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे आले असता, त्यांना श्रीकृष्णाने दोन पर्याय दिले, `मी की माझे सैन्य?' दुर्योधनाने सैन्य मागून घेतले. अर्थात ऐहिक सुखाची निवड केली. याउलट श्रीकृष्णाला मागून घेतले असते, तर कदाचित यशाचे माप त्याच्या बाजूने झुकले असते. 

दुसरी चूक म्हणजे, माता गांधारीने त्याला शिशूअवस्थेत पाहण्याचा मनोदय व्यक्त केला होता़  परंतु त्याने लज्जारक्षणार्थ पाला पाचोळा गुंडाळून मातेची भेट घेतली. त्याने तसे केले नसते, तर आईच्या दिव्यदृष्टीतून निघालेल्या शक्तीमुळे त्याचा देह कोणालाही दुभंगता आला नसता. मातेला दुर्योधनाला नग्नावस्थेत पाहणे, याचा गर्भितार्थ असा की आपल्या मातेशी, जन्मदात्रिशी कधीही आडपडदा न ठेवता आपल्या चुकांची, पापांची कबुली देणे आवश्यक असते. दुर्योधनाने तसे केले नाही.

तिसरी चूक म्हणजे, युद्धभूमीवर सर्वात शेवटी केलेले पदार्पण. युद्धाचा आढावा घेण्यासाठी नेत्याने सदैव पुढे असले पाहिजे, तरच बाकी सैन्याला मानसिक बळ मिळते. मात्र, दुर्योधनाने बाकीच्यांना पुढे पाठवून स्वत: शेवटी जाण्याची खेळी खेळली. त्यामुळे त्याला युद्धातले पेचप्रसंग जाणून घेता आले नाहीत आणि त्याच्या चुकांमुळे बाकीच्यांचा मृत्यू झाला.

या तिनही चूकांचे मूळ एका घोर पातकात दडले होते, ते म्हणजे मातेसमान असणाऱ्या कुलवधूचे अर्थात द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा कट! या पापातून त्याची सुटका नव्हती. त्याचे फळ मिळाले आणि शूरवीर योद्धा असूनही दुर्योधनाला अपयशाने प्राण गमवावे लागले. 

श्रीकृष्णांचे बोल ऐकून दुर्योधनाच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. परंतु, खूप उशीर झाला होता. शेवटचा श्वास सोडताना त्याने श्रीकृष्णाला डोळे भरून पाहिले आणि हात जोडत जगाचा निरोप घेतला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Duryodhana's downfall: Arrogance, immorality, or fate? Krishna reveals the reasons.

Web Summary : Duryodhana's defeat stemmed from choosing army over Krishna, disrespecting his mother, and late war arrival. Draupadi's humiliation sealed his fate. Krishna exposed these fatal flaws as Duryodhana breathed his last.
टॅग्स :MahabharatमहाभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी