शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तुम्हालाही झटपट श्रीमंत व्हायचे आहे? मग ही गोष्ट वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 08:00 IST

यशस्वी व्हायचे असेल, सर्व प्रथम आपली ठराविक चाकोरी मोडायला हवी. चौकटीच्या बाहेरचे विश्व पहायला हवे. तसे केले, तरच तुम्हीदेखील एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल!

एकदा एक साधू महाराज या गावातून त्या गावात प्रबोधन करत चालले असता एका गावात मुक्कामी थांबले. त्यांनी मुद्दाम एक गरीबाच्या झोपडीचा आश्रय मागितला. त्या झोपडीत नवरा बायको दोघेच होते आणि झोपडीबाहेर एक गाय दावणीला बांधली होती. 

साधू महाराजांना एका रात्रीसाठी आश्रय मिळावा, म्हणून नवरा बायकोने जमेल तसे आदरातिथ्य केले. प्यायला दूध आणि जेवायला भाजी भाकरी दिली. साधू महाराजांनी त्यांची विचारपूस केली. त्यांचा व्यवसाय विचारला.

नवरा म्हणाला, `आमचे सगळे काही ठिक चालले आहे महाराज. झोपडीबाहेर बांधलेली गाय, तिला आम्ही कामधेनूच म्हणतो. तिच्या कृपेने दोन वेळच्या जेवणाची सोय होत आहे. तिचे अमृततुल्य दूध विकून आमची गुजराण होत आहे.'

तो हे सांगत असताना बायको मात्र धस्फ़ुसत होती. साधू महाराजांनी तिलाही बोलायला सांगितले. ती म्हणाली, `धनी म्हणतात ते खोटे नाही. गायीमुळे आमची रोजी रोटी सुरू आहे. पण किती दिवस हे गरीबीत दिवस काढायचे. मला वाटते, श्रीमंत असावे, उंची कपडे घालावे, दोन वेळच्या जेवणासाठी मिळकतीवर अवलंबून न राहता, अन्नाची कमतरता भासू नये. या उत्पन्नातून आपलेच काय, तर इतरांचेही पोट भरावे. पण दूरवर आशेचा किरण दिसत नाही. काय करावे महाराज?'

त्यावर साधू महाराज म्हणाले, `सर्वप्रथम गाय विकून टाका. तिच्यामुळे तुमची प्रगती थांबली आहे.'असे म्हणत साधू बाबा एक रात्रीची विश्रांती घेऊन निघून गेले. नवरा बायको त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागले. त्यांना वाटले ही गाय अशुभ आहे, तिच्यामुळेच आपली प्रगती थांबली आहे, असे बहुदा साधू महाराजांना सुचवायचे असावे.

आर्थिक परिस्थिती सुधारावी, म्हणून त्यांनी साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जड अंत:करणाने गायीला योग्य हाती सोपवले. परंतु उत्पन्नाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे त्यांची परिस्थिती आणखी बिघडली. 

साधारण वर्षभराने साधू महाराज तिथे आले आणि त्यांनी त्याच घरात जाऊन आश्रय मागितला. मात्र आता झोपडीवजा घर दुमजली बंगल्यासारखे विस्तारले होते. अंगणात चार गायी, चार बकऱ्या , २ म्हशी, कोंबड्या एवढे पशुधन वाढले होते. दार उघडताच सर्व सुविधांनी युक्त असलेले आलिशान घर दिसले. त्या माणसाने साधूंना ओळखले. व त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले, म्हणून फळ मिळाले, असे सांगितले.

साधू महाराजा खुश झाले. एका गायीवर दोघांचा चरितार्थ अवलूंन असल्याने, प्रगतीला वाव नव्हता. ती विकल्यानंतर उपजिवीकेचे साधन गमावल्याची खंत वाटू लागली. व त्याने आणखी मेहनत करून, दुसऱ्याच्या घरी चाकरी करून, पैसे साठवून वर्षभरात स्वत:ची एवढी प्रगती केली, जी त्याने एवढ्या वर्षात कधीच केली नव्हते. 

याचाच अर्थ ते दाम्पत्य गायीवर अवलंबून होते. तो आधार सुटल्यामुळे त्यांनी त्यांची प्रगती केली. आपल्यालाही आपली प्रगती करायची असेल, श्रीमंत-यशस्वी व्हायचे असेल, सर्व प्रथम आपली ठराविक चाकोरी मोडायला हवी. चौकटीच्या बाहेरचे विश्व पहायला हवे. तसे केले, तरच तुम्हीदेखील एक ना एक दिवस नक्की यशस्वी व्हाल!