कासवाकृती नक्षीदार अंगठी तुम्हीसुद्धा वापरता का? जाणून घ्या त्या अंगठीशी निगडित गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 03:02 PM2021-06-11T15:02:38+5:302021-06-11T15:03:18+5:30

कासवाच्या गतीने का होईन रोज थोडी थोडी प्रगती केली पाहिजे असे म्हणतात, त्यानुसार ही अंगठी आपल्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल. 

Do you use a tortoise-shaped ring? Learn about the things associated with that ring! | कासवाकृती नक्षीदार अंगठी तुम्हीसुद्धा वापरता का? जाणून घ्या त्या अंगठीशी निगडित गोष्टी!

कासवाकृती नक्षीदार अंगठी तुम्हीसुद्धा वापरता का? जाणून घ्या त्या अंगठीशी निगडित गोष्टी!

googlenewsNext

अंगठी हा जरी दागिन्यांतला एक प्रकार असला, तरी ज्योतिष शास्त्रात त्याचा वापर विविध प्रकारच्या रत्नासाठी केला जातो. ही रत्न केवळ शोभेची नसून भाग्यकारक तसेच ग्रहांना अनुकूल दिशा देणारी असतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सुचवलेल्या रत्नांची अंगठी घातली जाते. परंतु गेल्या काही काळात या अंगठीवर नक्षीदार कासव का येऊन बसले आणि त्याचा ज्योतिष शास्त्राशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया. 

कासवाला वास्तुशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार कासव समृद्धतेचे चिन्ह मानले जाते. हे चिन्ह आपल्या धाग्यासाठी देखील लाभदायक ठरावे म्हणून अंगठी आणि कासवाच्या चिन्हाची सांगड घालून नक्षीदार अंगठीची रचना करण्यात आली असावी. सध्या कासवाची अंगठी घालण्याची प्रथाही वाढली आहे. चला तर मग, ज्योतिष आणि वास्तु यांचे मिश्रण म्हणता येईल अशा अंगठीचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊ. 

१. असे मानले जाते, की कासव लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि समुद्र मंथनात ते प्राप्त झाले. घरात कासवाचे चिन्ह ठेवणे शुभ मानले जाते. तसेच अलंकार रूपात परिधान केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

२. कासवाची नक्षी असलेली अंगठी घालताना, ती योग्य पद्धतीने घातली पाहिजे.अंगठीची दिशा योग्य असली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण ही अंगठी घालता तेव्हा कासवाचे डोके आपल्याकडे आणि शेपटीची बाजू बाहेरील बाजूने ठेवा.

३. कासव हे लक्ष्मीशी संबंधित असल्याने शुक्रवार हा अंगठी घालण्यासाठी शुभ मानला जातो, कारण हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

४. अलंकार म्हणून ही अंगठी वापरत असाल तर धातूचे बंधन नाही, परंतु भाग्यकारक म्हणून या अंगठीचा वापर करत असाल ही अंगठी चांदीतून घडवल्यास जास्त लाभदायक ठरते. 

५. ही अंगठी आपण कोणत्या बोटात घातली आहे हे पाहणेदेखील महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की ही अंगठी अनामिकेत म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटातच  परिधान केली पाहिजे. तरच ती लाभदायक ठरते. 

६. कासवाच्या गतीने का होईन रोज थोडी थोडी प्रगती केली पाहिजे असे म्हणतात, त्यानुसार ही अंगठी आपल्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल. 
 

Web Title: Do you use a tortoise-shaped ring? Learn about the things associated with that ring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.