शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2021: गोष्टीतल्या प्रधानाने लक्ष्मीकडे जे मागितले, ते तुम्हीही मागितले तर लक्ष्मी कायम तुमच्याकडे राहील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 15:28 IST

Diwali 2021 : देव प्रसन्न व्हावा असे आपल्याला नेहमी वाटते, पण तो प्रसन्न झाला तर नेमके काय मागायचे याचा विचार कधी केलाय? नसेल केला, तर ही गोष्ट नक्की वाचा!

चोर-दरोडेखोरांजवळ अमाप पैसा असतो. परंतु, तो त्यांना कधीच लाभत नाही. कारण तो पैसा त्यांनी वाममार्गाने कमावलेला असतो. त्यांच्या तिजोरीतून लक्ष्मी वारंवार बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. याउलट जिथे कष्ट, श्रम, प्रामाणिकपणा आहे, तिथे लक्ष्मी सन्मानाने जाते, राहते आणि वृद्धिंगत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण तिची पूजा करतोच, अशा वेळी तिच्याकडे काय मागितले पाहिजे, हे सांगणारी एक बोधकथा. 

आटपाट नगराच्या कोण्या एका रंकावर लक्ष्मी प्रसन्न झाली. हा रंग जन्मापासून दरिद्री असल्यामुळे त्याला कुठल्याही कामात अर्थलाभ होत नसे, हाताला यश लाभत नसे. अगदी अटीतटीचा, निर्वाणीचा उपाय म्हणून लक्ष्मीची उपासना त्याने केली आणि त्यामुळे लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली. प्रसन्न होऊनही लक्ष्मी चिरकालासाठी त्याच्याकडे येऊन राहू शकत नव्हती तडजोड म्हणून लक्ष्मीने प्रेरणा दिली आणि त्या राज्यातल्या राजाचा प्रधान झाला, त्याचा सगळा जीवनक्रमच बदलला. दिवस कसे सरले, त्याला कळलेच नाही आणि बारा वर्षांचा काळ निघून गेला. 

बारा वर्षानंतर लक्ष्मी जशी आली, तशी निघून जाऊ लागली. पण त्यापूर्वी तिने ह्या पूर्वाश्रमीचा रंक असलेल्या प्रधानाची भेट घेतली. ती त्याला म्हणाली, `मी निघाले, आता यापुढे तू तुझा संसार सांभाळ.' प्रधान गडबडला. लक्ष्मी नसल्याने काय होते, याचा दारुण अनुभव त्याने घेतला होता. पुन्हा त्याला तो अनुभव नको होता. पण काय करणार? लक्ष्मीने दिलेली बारा वर्षांची मुदत संपून गेली होती.  तो आणि त्याची बायको-मुले गयावया करू लागली, रडू लागली, गडाबडा लोळू लागली. 

लक्ष्मी म्हणाली, `हे बघा, मी तर या घरातून जातच आहे, पण तुम्हाला असे दु:खात लोटून जाणे, मला बरे वाटणार नाही. तुम्ही माझ्याकडे काही मागा, तेवढे मी देते आणि बाकीचे सगळे घेऊन जाते.' प्रधान म्हणाला, `माते, आम्हाला विचार करायला एक दिवसाची मुदत दे.'

लक्ष्मीकडे काय मागावे, याबद्दल तो बायकोशी बोलला. बायको म्हणाली, `ही सोन्याच्या जरीने मढवलेली पैठणी आणि तो सप्तपदरी चंद्रहार एवढे माझ्यासाठी ठेवायला सांगा. बाकीचे नेले तरी चालेल.' प्रधानाचा मोठा मुलगा म्हणाला, `ज्या घोड्यावरून मी रोज रपेट करतो, तो मला राहू द्या.' मोठी मुलगी म्हणाली, `मी माझ्या मैत्रिणींना जे चार दागिने दाखवते आणि चार घोड्यांच्या रथातून फिरते, तो राहू द्या, बाकीचे न्या.' प्रधानांची धाकटी मुलगी चुणचुणीत होती. ती म्हणाली, 'बाबा, प्रत्येक जण त्याला काय हवे, ते मागत आहे, लक्ष्मींने तुमच्या घराला काय हवे आहे, ते मागायला सांगितले आहे. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. कारण एकदा लक्ष्मी गेली, की तिच्यासकट बाकी गोष्टीही आपोआप जातील.'

प्रधान विचारात पडला. असे काय मागावे, की घरातला आनंद चिरकाल टिकून राहील? त्याने मुलीलाच विचारले, 'बाळ, तूच सांग मी काय मागू?' मुलीने वडिलांना सांगितले, 'सत्य आणि शांती घरात ठेव आणि कलह तू घेऊन जा, असे लक्ष्मी मातेला सांगा.' प्रधान आनंदून गेला. त्याने हेच मागणे लक्ष्मीकडे मागितले. ते ऐकून लक्ष्मीही गंभीर झाली आणि प्रधानाला म्हणाली, 'वत्सा, जिथे सत्य असते, तिथे माझा अधिवास असतो आणि जिथे माझा अधिवास असतो तिथे कलह नसतो. कलहाचे आगमन झाले, की मी निघून जाते. तुझ्या मागाणीप्रमाणे इथे सत्य राहिले, म्हणजे मलाही राहावेच लागेल.'

लक्ष्मी म्हणजे केवळ बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम नव्हे, लक्ष्मी म्हणजे तिजोऱ्या आणि कपाटे भरभरून ठेवलेला दोन नंबरचा पैसाही नव्हे. लक्ष्मी म्हणजे सत्य आणि शांती. या स्वरूपातील लक्ष्मीने सर्वांच्या घरी निरंतर अधिवास करावा, हीच आपणही लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करायची. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021