शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Diwali 2021: श्लोक, मंत्र व सोप्या पूजाविधीसह असे करा शास्त्रोक्त लक्ष्मीपूजन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 08:00 IST

Laxmi Pujan 2021 : लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६ वाजून ०२ मीनिटांपासून सुरू होऊन सायंकाळी ८ वाजून ३४ मीनिटांपर्यंत आहे. कशी करायची पूजा? जाणून घ्या.

यंदा ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. दरवर्षी कार्तिक कृष्ण अमावस्येला लक्ष्मीपूजा केली जाते. महालक्ष्मीबरोबरच तिचा सुपुत्र गणेश याचीही पूजा केली जाते. कारण, लक्ष्मी प्रसन्न झाली, तरी योग्य ठिकाणी तिचा विनीमय कसा करावा, यासाठी सद्बुद्धीची गरज असते. ती देणारी देवता, म्हणजे गणपती बाप्पा. म्हणून या माय-लेकाला लक्ष्मीपूजेच्या दिवशी आवाहन करतात आणि पूजा समर्पित करतात.

लक्ष्मीपूजेचे महत्त्व-समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आणि आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या, गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात़   लक्ष्मीपूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग यादिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून `चोपडा पूजन' करतात. तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात.

लक्ष्मीपूजेचा मुहूर्त-लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६ वाजून ०२ मीनिटांपासून सुरू होऊन सायंकाळी ८ वाजून ३४ मीनिटांपर्यंत आहे. 

लक्ष्मीपूजेचा विधी-सर्वप्रथम एक चौरंग मांडून पूजेचा परिसर शुचिर्भूत करून घ्यावा. त्यावर स्वच्छ व शुभ्र वस्त्र मांडावे आणि महालक्ष्मी तसेच महागणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी. गणपतीची यथासांग पूजा करून लक्ष्मीपूजेची सुरुवात करावी.

ओम अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्था गतोपि वा,य: स्मरेत पुंडरिकाक्षं स: वाह्याभंतर: शुचि:।।

हा मंत्र म्हणत मूर्तीवर पाण्याने आणि पंचामृतो अभिषेक करून घ्यावा. गंधाक्षता, फुले वाहून देवी आणि गणपतीला आवाहन करावे. त्याचवेळेस पृथ्वीमातेसही मनापासून अभिवादन करत ऋण व्यक्त करावेत. 

समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले,विष्णूपत्नी नम: स्तुभ्यम् पाद: स्पर्शम् क्षमस्वमे।

हा श्लोक म्हणत जमिनीला हात लावून नमस्कार करावा. भूमीपूजन आणि स्मरण याकरीता, कारण ही काळी आई आपल्याला धनधान्य देते आणि पालनपोषण करते. म्हणून तिला नमस्कार.

ओम पृथ्वी त्वया धृता, लोका देवि त्वं विष्णुना धृता,त्वं च धारय मां देवी पवित्रम् कुरु चासनम्

हा श्लोक म्हणत, 'पृथिव्यै नम:', 'आधरशक्तये नम:' असे म्हणत ताम्हनात पाणी सोडावे.

त्यानंतर ओम केशवाय नम:, ओम नारायणाय नम:, ओम माधवाय नम: मंत्र म्हणत गंगोदक प्राशन करावे. पळीभर पाणी हातात घेऊन संकल्प सोडावा आणि हातात फुले , अक्षता आणि एक रुपया घेऊन त्यावर पळीभर पाणी सोडत देवाला अर्पण करावा. नवग्रहांची पूजा करून, नवग्रह स्तोत्र म्हणावे किंवा ऐकावे. पूजेतील सर्व देवांना गंध व फुल वाहून नमस्कार करावा. त्यानंतर लक्ष्मीपूजा करताना धन,संपत्ती लक्ष्मीचरणी अर्पण करून श्रीसुक्त, लक्ष्मीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्रपठण किंवा श्रवण करावे.

दिव्यांचे पूजन करावे. महालक्ष्मी आणि गणपतीसमोर दिव्यांची आरास करावी. धूप-दीप लावावे. सुबक रांगोळी काढावी. फुलांची आरास करावी. मंगल संगीत लावावे. सर्व पूजा समाप्त झाल्यावर आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागावी. गणपतीची, देवीची आरती करावी. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021