श्रीदत्तगुरुंची उपासना, भक्तांची पूर्ण झाली इच्छा; स्वामी समर्थांनी दिले दत्तावतारांत दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 02:40 PM2024-02-28T14:40:14+5:302024-02-28T14:42:11+5:30

Shree Swami Samarth: गुरुवारी औदुंबर पंचमी आहे. स्वामींची विशेष पूजा केल्यास शुभफल मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

devotees experience swami samarth maharaj is nrusimha saraswati and dattavatar | श्रीदत्तगुरुंची उपासना, भक्तांची पूर्ण झाली इच्छा; स्वामी समर्थांनी दिले दत्तावतारांत दर्शन

श्रीदत्तगुरुंची उपासना, भक्तांची पूर्ण झाली इच्छा; स्वामी समर्थांनी दिले दत्तावतारांत दर्शन

Shree Swami Samarth: स्वामी समर्थांचे शिष्यगण, सेवेकरी यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगदी जवळून पाहिल्या आहेत. तत्कालीन सेवकांनी बहुतांश गोष्टी या पाहून त्याची नोंद करून ठेवल्याचे सांगितले जाते. स्वामी वचनांचा तर आजच्या काळातही अनेक जण अनुभव घेत असल्याचे दिसून येते. स्वामी दत्तावतार मानले जातात. अनेक प्रसंगांमधून खुद्द स्वामींनीच स्वतःची ओळख सांगितली आहे. गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी औदुंबर पंचमी आहे. यानिमित्त दत्तावतार असलेल्या स्वामींचे आवर्जून विशेष पूजन, नामस्मरण आणि स्वामीनामाचा जप केल्यास शुभ-पुण्य मिळू शकेल. स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जाते. गुरुवारी औदुंबर पंचमी येणे, विशेष शुभ-फलदायी मानले गेले आहे. स्वामींनी काही भाविकांना दत्तावरांत दर्शन दिल्याच्या कथा आढळून येतात. जाणून घेऊया...

ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा लोक साक्षात डोलायचे. ते अनन्य दत्तभक्त होते. मात्र, अंगावर कोड आल्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले होते. आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? असा विचार ते कायम करत बसायचे. एक दिवस वैतागून निर्णय करतात की, आता संसार सोडून काशीला जायचे आणि उर्वरित जीवन तिथेच व्यतीत करायचे. आपल्या कुटुंबाची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी ते गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतात.

स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी प्रचिती येते

काशीला जायच्या आधी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर कीर्तन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी प्रचिती येते. स्वामी चरणी नतमस्तक होतात. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, आयुष्यभर दत्त उपासना करूनही मला रोग का झाला? स्वामी म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेने रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार.

आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना?

दुसरीकडे, गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असे त्याचे मत होते. अक्कलकोटला पोहोचल्यावर तत्क्षणी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात की, काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना? स्वामींच्या प्रश्नाने पुजारी चपापतो. पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात की, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? यावर पुजारी उत्तरतो की, श्रीनरसिंहसरस्वतीची!

साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते

स्वामी म्हणतात की, आम्ही नरसिंहभान आहोत! नीट बघ आम्हाला! तेथेच पुजाऱ्याला साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते. पुजाऱ्याला गहिवरून येते. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते की, स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी नतमस्तक ठेऊन क्षमा मागतो आणि म्हणतो की, अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे.

||श्री स्वामी समर्थ||

 

Web Title: devotees experience swami samarth maharaj is nrusimha saraswati and dattavatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.