शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:50 IST

Deep Amavasya 2025 Vrat Katha: दीप अमावास्या आपण का साजरी करतो यामागे आहे एक रोचक कथा, ती वाचल्याशिवाय दीप अमावास्येचे व्रत पूर्ण होणार नाही!

आषाढ अमावस्येला (Ashadha Amavasya 2025) 'दिव्याची आवस' तसेच दीप अमावास्या(Deep Amavasya 2025) म्हणतात. २४ जुलै रोजी दिव्यांची आवस आणि २५ जुलै पासून श्रावण(Shravan 2025) सुरू होत आहे. या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्याभोवती रांगोळी काढतात. रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. 'सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर' अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात. दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे. 

Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!

ती कथा पुढीलप्रमाणे - 

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती. त्या दोघांनी स्वत:च्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले. 

पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव 'सगुणा' होते. विनीतला तीन मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्रय आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले.

Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या

पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमुल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपने ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले.

तेव्हा तिने `येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत' अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले, क जी जी सवाष्णबाई घरातघरात प्रवेश करू बघेल, तिच्याकडून `मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही' असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. 

eep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...

तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधार दिसला. मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारीद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले. त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले. राज्यातील ससर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.

Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...

अशी ही दिव्याच्या अवसेची कथा तुम्हालाही फळो, ही शुभेच्छा!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीLaxmi Pujanलक्ष्मीपूजनchaturmasचातुर्मास