शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Deep Amavasya 2024: दिव्यांच्या अवसेची कथा वाचल्याशिवाय व्रत राहील अपूर्ण; वाचा कथा आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 07:00 IST

Deep Amavasya 2024: लक्ष्मी कृपेने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अपार धनसंपदा मिळवण्यासाठी वाचा दिव्यांच्या अवसेची कथा!

आषाढ अमावस्येला (Ashadha Amavasya 2024) 'दिव्याची आवस' म्हणतात. रविवारी ४ ऑगस्ट रोजी दिव्यांची आवस आहे. या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासूनपुसून लख्ख करतात. नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्याभोवती रांगोळी काढतात. रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात. त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. 'सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या, तू स्वत: तेज आहेस, प्रकाश आहेस. तू आमच्या पूजेचा स्वीकार कर, आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर' अशी त्याची प्रार्थना करतात. त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात. दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे. 

ती कथा पुढीलप्रमाणे - 

तामीळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती. त्या दोघांनी स्वत:च्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले. 

पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या. त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव 'सगुणा' होते. विनीतला तीन मुलगे झाले. पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती. परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्रय आले. त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले. धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही. तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले.

पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला. स्नानाच्यावेळी त्याने आपली बहुमुल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती. ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली. मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली. ती सगुणेला मिळाली. सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले. तिने प्रामाणिकपने ती राजाला नेऊन दिली. राजाने खूष होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले. शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले.

तेव्हा तिने `येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील. बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत' अशी इच्छा प्रदर्शित केली. राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले. इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले. नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले. तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या दिराला सांगून ठेवले, क जी जी सवाष्णबाई घरातघरात प्रवेश करू बघेल, तिच्याकडून `मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही' असे वचन घ्या. मगच तिला बाहेर जाऊ द्या. 

तिन्ही सांजेच्यावेळी माता लक्ष्मीदेवी त्या राज्यात आली. तिला सर्वत्र अंधार दिसला. मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते. तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली. तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले. लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारीद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली. तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले. त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले. राज्यातील ससर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले.

अशी ही दिव्याच्या अवसेची कथा तुम्हालाही फळो, ही शुभेच्छा!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Shravan Specialश्रावण स्पेशल