शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाशी लढताना फक्त हाताचा नाही; तर 'मनाचा सॅनिटायझर'ही गरजेचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 10:18 IST

सद्गुरु श्री. वामनराव पै सांगतात, "परिस्थिती बदलण्याच्या मागे लागण्यापेक्षा मन:स्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल."

ठळक मुद्देसर्व सुखी तर आपण सुखी, सर्वजण आरोग्यसंपन्न तरच आपण आरोग्यसंपन्न.या संकटाला केवळ बाहेरून तोंड देऊन उपयोग नाही तर आतूनही या परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे. आपल्या मनातही भीतीचा, नकारात्मक विचारांचा जो विषाणू लपलेला आहे त्याची कुणाला चाहूलही नाही.

जगातील प्रत्येक व्यक्तीचे मन भीतीने ग्रासलेले आहे ते कोरोना विषाणूमुळे! 

आपला धर्म, जात, भाषा, प्रांत व पंथ हे सारे विसरून जगातील सर्व देश या जागतिक आपत्तीविरुद्ध  लढण्यासाठी एकत्र आलेले आहेत. खरेतर आपण सर्वजण परस्परांवर अवलंबून आहोत. सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्येचे तत्त्वज्ञान म्हणते, "आपण एकटे सुखी होऊ शकत नाही. सर्व सुखी तर आपण सुखी, सर्वजण आरोग्यसंपन्न तरच आपण आरोग्यसंपन्न." कारण  It is not only my life; it is our life ही गोष्ट सर्वांना आता प्रकर्षाने  जाणवू लागली आहे. म्हणूनच तर आर्थिक महासत्ता असलेल्या देशापासून ते सर्व  विकसनशील  देश या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले आहेत. 

या संकटजन्य परिस्थितीला कारण आपणच आहोत; त्यामुळे यातून मार्ग काढण्याची जबाबदारीही आपली म्हणजेच  समस्त मानवजातीची आहे. 

आज समाजातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, देशाची शासनव्यवस्था या परिस्थितीला  तोंड देण्यासाठी झगडत आहे; परंतु या संकटाला केवळ बाहेरून तोंड देऊन उपयोग नाही तर आतूनही या परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे. 

सद्गुरु श्री. वामनराव पै सांगतात, "परिस्थिती बदलण्याच्या मागे लागण्यापेक्षा मन:स्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल. " बाहेरून तोंड देण्यासाठी आज सर्व यंत्रणा कार्यरत आहेतच; पण आपली मन:स्थिती बदलण्यासाठी अजूनही कुणी सज्ज नाही. किंबहुना याचा विचारदेखील कुणी करीत नाही.  

सर्वजण विषाणू मारण्यासाठी  सॅनिटायझर्सचा वापर करीत आहेत. पण आपल्या मनातही भीतीचा, नकारात्मक विचारांचा जो विषाणू लपलेला आहे त्याची कुणाला चाहूलही नाही. म्हणूनच आज गरज आहे ती हाताच्या सॅनिटायझर सोबतच  मनाचा  सॅनिटायझर वापरण्याची. 

हा केवळ तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचे विषाणू नष्ट करणारा सॅनिटायझर नसून तुमच्या मनातून थेट जगापर्यंत सुंदर, सकारात्मक विचारतरंग घेऊन जाणारा सॅनिटायझर आहे. संपूर्ण जगाच्या सामूहिक अंतर्मनाच्या शक्तीला एका दिव्य, सकारात्मक विचारासाठी एकत्र आणणारा सॅनिटायझर आहे. तेव्हा मनाचा सॅनिटायझर कोणता, हे या व्हिडिओतून नक्की जाणून घ्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसspiritualअध्यात्मिक