coronavirus: ...म्हणून काळजीला दूर ठेवण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 04:26 AM2020-05-16T04:26:11+5:302020-05-20T10:54:01+5:30

आपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढे आपल्या हाती आहे.

coronavirus: Avoid anxiety | coronavirus: ...म्हणून काळजीला दूर ठेवण्याची आवश्यकता

coronavirus: ...म्हणून काळजीला दूर ठेवण्याची आवश्यकता

Next

- स्नेहलता देशमुख

आपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढे आपल्या हाती आहे. काळजी करण्याने मानसिक व शारीरिक आजार बळावतात. काळजी करायला काही कारण लागत नाही. कारण ती आपल्यापाशीच असते; पण आपण एकमेकांना धीर देताना काळजी घ्या स्वत:ची म्हणतो आणि काळजी वाढवितो. रक्तदाब व साखरेचे प्रमाण वाढवतो. अनेक आजारांना जणू निमंत्रण देतो. हे टाळायचे तर कर्तव्य करता करता भगवंतावर निष्ठा ठेवून आत्मविश्वास वाढवून कामावर लक्ष केंद्रित करून मनाच्या काळजीचे दार बंद करणे उत्तम. संकट आले की, आपण कुंडली मांडतो, ज्योतिषाकडे जातो. गुरूकडे जातो. त्यांनी सुचवलेले उपाय करतो. पैसे खर्च करतो; पण काळजी काही दूर होत नाही. भगवंताचे नामस्मरण स्थिर, प्रसन्न चित्ताने मांडी घालून, दीर्घ श्वसन करून एका बिंदूवर लक्ष केंद्रित केल्यास मेंदूचा छोटासा भाग उद्दिपीत होतो आणि त्या पिट्युटरी ग्रंथीतून एल्लङ्मि७्रस्रँ्रल्ल२ नावाची एल्ल९८ेी२ स्रावतात. ही एल्ल९८ेी२ प्रतिकारशक्ती म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवितात. आपले मन स्थिर होते. आजच्या ताण-तणावाच्या काळात सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणे, अहंभाव दूर ठेवणे हा काळजी दूर करण्याचा उपाय आहे. देहाभिमान दूर ठेवला तर प्रपंचातली काळजी सहज दूर होईल. लहान मुलाकडून शिकण्यासारखी छोटी गोष्ट. पावसाचे पाणी जमा झाले की, मुले होड्या करतात व त्या पाण्यात सोडतात. काही होड्या छान तरंगतात. त्यामुळे मुले टाळ्या वाजवून हसतात. काही होड्या बुडतात, तरीसुद्धा ही मुले होडी बुडली म्हणूनही हासतात. म्हणूनच ‘सुख-दु:खे समे कृत्वा लाभा लाभौजया जयू...’ आनंदी राहा आणि म्हणा ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वव:’’

Web Title: coronavirus: Avoid anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.