शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

कृषी आणि ऋषी यांच्या विचारांचा संगम स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या अमोघ वाणीतून, लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 9:17 AM

बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. 

ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालायची, तर ते मार्गदर्शन करण्यासाठी अधिकारी व्यक्ती हवी. हे कार्य करत आहेत जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज. त्यांनी असंख्य व्यसनी जीवांना व्यसनमुक्त केले. संसारात भरकटलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना श्रमभक्ती शिकविली. सत्संगाच्या माध्यमातून अनेक पदभ्रष्ट झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांचे विचार आपल्यालाही 'लोकमत भक्ती' या युट्युब भक्ती चॅनेलच्या माध्यमातून ऐकता येणार आहे. 

स्वामी शांतिगिरीजी बाबांचा जन्म साधारणतः १९६१ मध्ये नाशिक जिल्ह्यातील लाखलगाव या ठिकाणी माता फुलाबाई व पिता यशवंतराव कांडेकर यांच्या उदरी झाला. घरातील अध्यात्मिक वातावरणाचा बाळ बाबूवर(स्वामी शांतिगिरीजी महाराज) प्रभाव पडत होता. त्याच वातावरणात बाबू वाढत होता. बाबूचे वय १५ ते १६ वर्ष असावे, अचानक बाबूची दृष्टी गेली. फुलामाता व यशवंतराव घाबरून गेले. दवाखाना केला पण काही उपयोग होईना. तेव्हा यशवंतरावाना कुणीतरी सांगितले की त्र्यंबकेश्वर ला एक जनार्दन बाबा आहे, त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे. ते नक्कीच बाबूला दृष्टी देतील.  यशवंतराव व फुलामाता बाळ बाबूला घेऊन त्र्यंबकेश्वर ला आल्या बाबाजी श्रमदान करणाऱ्या भक्तांजवळ होते. फुलामाता व यशवंतरावांनी सर्व हकीकत बाबाजींच्या कानावर घातली. तितक्यात बाबाजींनी आपली दृष्टी या बाबूकडे वळविली आणि बाजूचे खडे उचलायला सांगितले. बाबूनेही खडे उचलायला आणि इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. खडे उचलता उचलता आणि फेकता फेकताच बाबूला दिसायला लागले. आई वडिलांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी बाबाजींसमोर दंडवतच घातले. आता मुलाला दृष्टी आली म्हणून आई वडिलांना वाटले की आता बाबूला घरी घेऊन जाऊ. घरी आल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा बाबूची दृष्टी गेली. पुन्हा आई वडील बाबूला बाबांजीकडे घेऊन आले. बाबाजींनी पुन्हा बाबूला दृष्टी दिली. पण बाबाजींनी बाबुच्या आई वडिलांना सांगितले की हा बाबू माझ्यासाठी आहे याला माझ्याजवळच राहुद्या. अशाप्रकारे स्वतः जनार्दन स्वामींनी दिव्य दृष्टी दिलेले महात्मा म्हणजेच बाबू महात्मा अर्थातच जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेचे विद्यमान बाबाजी स्वामी शांतिगिरीजी महाराज होय. 

साधारणतः १९७५-७६ मध्ये शांतिगिरीजी बाबांनी जे घर सोडले ते आजतागायत आहे. 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.' या उक्तीप्रमाणे शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य सुरू केले. पहिल्यापासूनच शांतिगिरीजी बाबा जनार्दन बाबांचे आवडते शिष्य होते. सन १९८९ मध्ये जनार्दन बाबांचे महानिर्वाण झाले. आणि सोडशी सोहळ्यात जनार्दन बाबांच्या उत्तराधिकारी पदाची शाल अनेक मान्यवरांच्या साक्षीने आणि शंभू पंचनाम जुना आखाड्याच्या साधूंच्या उपस्थितीत शांतिगिरीजी बाबांच्या अंगावर चढवली. परंतु आजही काही नतभ्रष्ट लोक हे मान्य करायला तयार नाही. त्यानंतर ही शांतिगिरीजी बाबांना अनेक प्रकारचे त्रास काही लोकांनी दिला. प्रसंगी मारायचा प्रयत्न झाला. परंतु जनार्दन बाबांनी दिव्य दृष्टी दिलेल्या शांतिगिरीजी बाबांनी आपले कार्य थांबवले नाही. या सर्वांतून शांतिगिरीजी बाबांनी संयमाने आणि धैर्याने मार्ग काढत बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ती आजतागायत सुरू आहे. 

अखंड नऊ वर्षे मौन व्रताची साधना सुरू झाली. एक शब्दही न बोलता जनार्दन बाबांचे पुण्यस्मरण सोहळे सुरू झाले. बाबाजींचे ११ वे पुण्यस्मरण विश्वशांती सोहळा, १३ वे पुण्यस्मरण श्री राम सिता धर्म सोहळा असेल . किंवा १६ वे पुण्यस्मरण जय हनुमान धर्म सोहळा असेल असे अनेक 'न भूतो न भविष्यती' सोहळे करून धर्मसंस्कार शिरोमणीचा पुरस्कार प्राप्त करून घेतला. पुढे २१ वे ते ३० व्या पुण्यस्मरणाची वाटचाल आणि ३१ व्या पुण्यस्मरणाची चाहूल लागलेले एक अलौकीक महात्मा म्हणजेच शांतिगिरीजी महाराज होय. 

बाबाजींनी सुरू केलेल्या अनुष्ठान, गुरुकुल, श्रमदान, कृषी व ऋषी सेवा आणि गो सेवा या दिव्य पाच परंपरांचे नित्य पालन शांतिगिरीजी बाबा नेटाने करत आहेत आणि लाखो भक्तांकडून करवून घेत आहेत. 

शेतकरी संकटात सापडला तर त्याच्यासाठी पर्जन्ययाग यज्ञ करणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करून दाखवून दिले. आज कोरोना संकटातून देशाला नव्हे तर विश्वाला मुक्ती मिळावी म्हणून दैनंदिन होम हवन, महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या मजुरांना भोजनाची व्यवस्था असेल. आज प्रत्येक आश्रमात दोन वेळचे मोफत भोजन अन्नदान सुरू आहे. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक जीवाला शांती मिळावी म्हणून सतत प्रयत्नशील राहणे. असे अनेक समाजपयोगी कार्य शांतिगिरीजी बाबा करत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वेळेस हजारो साधू संतांना, संन्यासी महाराजांना भोजन देणे, वृक्षारोपण करणे, फळ फुलांच्या झाडांची देखभाल व संरक्षण करणे. असे अनेक उपक्रम शांतिगिरीजी बाबा आश्रमच्यावतीने करत असतात. 

त्यांचे सद्विचार जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. लोकमत भक्तीची युट्यूब लिंक - https://youtube.com/c/LokmatBhakti

टॅग्स :Shantigiri Maharajशांतिगिरी महाराज