घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश टाळायचा असेल तर फर्निचरची निवड डोळसपणे करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:29 PM2022-04-06T17:29:08+5:302022-04-06T17:29:30+5:30

वास्तुनुसार घरातील फर्निचर कसे व कोणत्या दिशेला असावे ते जाणून घेऊया.

Choose furniture wisely if you want to avoid the entry of negative energy into the house! | घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश टाळायचा असेल तर फर्निचरची निवड डोळसपणे करा!

घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश टाळायचा असेल तर फर्निचरची निवड डोळसपणे करा!

googlenewsNext

वास्तुशास्त्रात दिशेला विशेष महत्त्व दिले आहे तर जीवनात उर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकारात्मक ऊर्जा माणसाचे जीवन आनंदी ठेवते, तर नकारात्मक ऊर्जा व्यक्तीची निर्णयक्षमता नष्ट करते. याशिवाय सध्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा कुटुंबाच्या प्रगतीत बाधा आणते. दहा दिशांकडून येणारी ऊर्जा आपल्या वास्तूवर प्रभाव टाकत असते. म्हणून कोणत्या दिशेला कोणते साहित्य ठेवणे योग्य-अयोग्य याबाबत वास्तू तज्ञ मार्गदर्शन करतात.  वास्तुशास्त्रानुसार घराच्या फर्निचरशी संबंधित वास्तु नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुनुसार घरातील फर्निचर कसे व कोणत्या दिशेला असावे ते जाणून घेऊया.

वास्तूनुसार घराचे फर्निचर कसे असावे?

>>वास्तुशास्त्रानुसार दिवाणखान्यात किंवा गॅलरीत जास्त फर्निचर ठेवणे चांगले नाही. त्यामुळे ऊर्जा बांधली जाते. नकारात्मक ऊर्जा वाहू लागते. अशा परिस्थितीत कुटुंबात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

>>वास्तूनुसार घरातील फर्निचर वजनदार आणि हलवता न येण्यासारखे फर्निचर पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नये. ते दक्षिण दिशेला ठेवावे. पूर्व आणि उत्तर दिशा सकारात्मक ऊर्जेची मानली जाते. ती ऊर्जा वस्तूंनी अडवून ठेवू नये. 

>>वास्तुशास्त्रानुसार घराचे फर्निचर खरेदी करताना ते फार जड नसावे याची विशेष काळजी घेतली पाहिजे. फर्निचर फिरते ठेवावे. एकाच जागी बराच काळ ठेवलेले फर्निचर वास्तूतील नावीन्य संपवून टाकतो. याउलट फर्निचरच्या जागेची अदलाबदल वास्तूतील सकारात्मक लहरी निर्माण करते. 

>>याशिवाय पलंगाच्या डोक्याच्या दिशेने चांगले चित्र लावावे. हिंसक प्राण्याची चित्रे लावू नयेत. अशुभ आकृत्या मनाची वृत्ती खराब करू शकतात तसेच कौटुंबिक जीवन खराब करू शकतात.

>>वास्तूमध्ये भडक रंग, गडद रंग आणि विशेषतः काळ्या रंगाचे फर्निचर टाळावे. त्या रंगामधून सकारात्मकता कधीही आकार घेत नाही. अर्थात काही फर्निचर याबाबतीत अपवाद धरावे लागतात. जसे की सोफा, कपाट, शूज रॅक वगैरे. परंतु यातही पूर्ण काळा रंग न निवडता तपकिरी रंगाचा पर्यायी वापर करता येईल. 

Web Title: Choose furniture wisely if you want to avoid the entry of negative energy into the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.