चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:04 IST2025-07-22T10:03:41+5:302025-07-22T10:04:26+5:30

Chaturmas Shivratri Vrat July 2025: चातुर्मासातील पहिली शिवरात्री कधी आहे? शिवपूजन कसे करावे? महत्त्व, महात्म्य आणि मान्यता जाणून घ्या...

chaturmas first masik shivratri july 2025 know about date shiv puja vidhi and significance of shiv ratri vrat in marathi | चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!

चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!

Chaturmas Shivratri Vrat July 2025: उत्तर भारतीय पंचांगानुसार श्रावण सुरू झाला आहे. पण, महाराष्ट्रात २५ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, आषाढ महिन्याची सांगता होताना शिवरात्री व्रत आहे. चातुर्मासातील हे पहिले शिवरात्री व्रत आहे. शिवरात्री व्रत हे महादेव शिवशंकर यांना समर्पित आहे. आषाढी देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिर्देत गेल्यावर संपूर्ण ब्रह्मांडाचे पालकत्व शंकरांकडे असते. त्यामुळे चातुर्मासात शिवाशी निगडीत व्रतांना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते, असे म्हटले जाते. शिवरात्रीला महादेवांचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या...

बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी मासिक शिवरात्री व्रत आहे. प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत असते. शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. शिवरात्रि ही महादेवांना समर्पित असलेले व्रत आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत.  रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते.

शिवरात्रीला शिवपूजन कसे कराल?

नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. चातुर्मासातील पहिली मासिक शिवरात्रि विशेष मानली गेली आहे. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. 

शंकरांच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करा, पुण्य मिळवा

प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

Web Title: chaturmas first masik shivratri july 2025 know about date shiv puja vidhi and significance of shiv ratri vrat in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.