शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:07 IST

Chaturmas 2025: ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होत आहे, तिथून पुढे ४ महिने व्रतस्थ जीवन जगता यावे म्हणून येत्या दहा दिवसात करतात आषाढ तळणीची चंगळ; सविस्तर वाचा!

हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस 'साजरा' करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते, नव्हे तर ते मिळते! जसे की आषाढ तळण! यालाच आखाड तळणे असेही म्‍हणतात. २६ जून रोजी व्रत वैकल्यांनी नटलेला आषाढ मास सुरू होत आहे आणि इथून पुढे चार महिने विविध उत्सवाचे वातावरण सुरूच राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने घरात गोड धोड करणे ओघाने आलेच, पण तळण-पुरण हे समीकरणही जुळून यावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी 'आषाढ तळण' या नावाने आषाढाचे पहिले दहा दिवस चमचमीत पदार्थ खाण्याची सवलत दिली आहे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आली की त्याबरोबर चातुर्मास(Chaturmas 2025) सुरू होणार आणि तिथून पुढे चार महिने व्रतस्थ जीवन आपण जगावे यासाठी शास्त्राने केलेली ही तरतूद असावी!

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची, संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे. आषाढ तळण त्यापैकीच एक आहे. आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो. अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड, कुरडया, सांडगे, शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते. श्रावणात व्रत वैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे आषाढ तळण अगदी दणक्यात पार पाडले जाते. हे घरगुती पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच, शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात. 

पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, भजी, कडबोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात असत. त्याला खीर, लाडू, शिरा इ. गोड धोड पदार्थांची जोड असे. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आले पाकची वडी याचाही समावेश केला जातो. आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो. 

मरीदेवीची पूजा: 

एवढे सगळे पदार्थ करायचे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा नाही, हे शक्य आहे का? ज्या अन्नपूर्णेच्या कृपेमुळे चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता येतो, त्या अन्नपूर्णेला मरिदेवीच्या रूपात या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तिची पूजा केली जाते. आरती होते आणि देवीची गाणी गात आषाढ तळणाचा(Ashadh Special food) आनंद लुटला जातो. 

Ashad Special Food: आषाढ तळला का? आषाढात पदार्थ तळण्याची प्रथा काय असते, पाहा आषाढ स्पेशल पुऱ्यांची रेसिपी

आपल्याला देवकृपेमुळे जसे मिळाले तसे वंचितांनाही मिळावे, म्हणून या खाद्यपदार्थांचे गरजूंना दान करून पुण्यही कमावले जाते. आपल्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घ्या, हीच तर आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यानुसार २६ जून ते ६ जुलै या दहा दिवसातला एकही दिवस वाया न घालवता आषाढ तळणाचा तुम्ही आनंद घ्या आणि इतरांनाही द्या.. आणि हो मरिमाताची पूजा विसरू नका. 

टॅग्स :foodअन्नchaturmasचातुर्मासAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Healthआरोग्यPuja Vidhiपूजा विधी