शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

दृष्टिकोन बदला, आयुष्य बदलेल - गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 8:00 AM

जे आपल्याला योग्य वाटते, ते   समोरच्याला योग्य वाटेलच असे नाही. त्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहिले, तर कदाचित नाण्याची दुसरी बाजू जाणून घेता येईल.

मी म्हणेन ती पूर्व, हा आपला स्वभाव असतो. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला योग्यच वाटत असते. परंतु, अचानक असे काही घडते की आपली चूक नसतानाही आपल्याला शिक्षा भोगावी लागते. असे का घडले, याचा विचार स्वतःच्या नाही, तर समोरच्याच्या दृष्टिकोनातून केला तर आपल्या चुकांचा उलगडा आपल्याला नक्कीच होऊ शकतो; सांगत आहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

ते म्हणतात दृष्टिकोन बदला, जग बदलेल. पण आपण नेमके उलट करण्याचा हट्ट धरतो. जग बदलू पाहतो आणि जगाला आपला दृष्टिकोन देऊ पाहतो. तसे घडतेही, परंतु आपले प्रयत्न योग्य दिशेने असले तरच! यासाठी समोरच्याचे विचार समजून घेण्याचीही सवय असावी लागते. जे आपल्याला योग्य वाटते, ते   समोरच्याला योग्य वाटेलच असे नाही. त्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहिले, तर कदाचित नाण्याची दुसरी बाजू जाणून घेता येईल. 

एक मुलगा खेळत खेळत आपल्या आई जवळ येतो. आईला म्हणतो, 'तू काय करतेयस?' आई सांगते, 'मी भरतकाम करून तुझ्या शर्टावर छान नक्षीकाम करतेय.' धाग्या दोऱ्यांची गुंतागुंत पाहून मुलगा म्हणतो, 'शी, ही कुठली नक्षी, हा तर नुसता दोऱ्यांचा गुंता आहे.'आई हसून मुलाला मांडीवर घेते आणि शर्टाची वरची बाजू दाखवत म्हणते, 'बाळा, तू चुकीची बाजू बघत होतास. आता वरून बघितल्यावर दिसली की नाही नक्षी?'ते पाहून मुलगा आनंदून गेला. त्याने पाहिलेली बाजू त्याला योग्य वाटत होती, पण गुंतागुंतीची दिसत होती. आईने दुसरी बाजू दाखवल्यावर त्याला दोऱ्यांनी गुंफलेली सुंदर नक्षी दिसली. परंतु मुलाने आपलेच म्हणणे रेटून धरले असते, तर त्याला त्याचेच म्हणणे योग्य वाटले असते आणि चांगली कलाकृती पाहण्यापासून तो मुकला असता. यासाठी नाण्याची दुसरी बाजू दाखवणारी आणि ती पाहायची तयारी असलेली व्यक्ती हवी. क्षणार्धात दृष्टिकोन बदलतो आणि संपूर्ण जगच सुंदर दिसू लागते. 

त्याचप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले भोग संपवताना त्रास होत असला, तरी देवाने भविष्यात नक्कीच काहीतरी चांगले वाढून ठेवले असेल हा विचार नक्की करा. स्वतःला दुसऱ्यांच्या  नजरेतूनही बघायला शिका. दुसऱ्यांचे म्हणणे समजून घ्या. गैरसमजांची भिंत दूर होईल आणि आयुष्य नक्षीदार होईल.