Chandra Grahan September 2025 Daan: यंदाच्या चातुर्मासातील भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते. २०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे.
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून, मध्यरात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून मृत्यू पंचक सुरू झाले आहे. या चंद्रग्रहणाला ५०० वर्षांनी काही अद्भूत शुभ योग जुळून आले आहेत. बुधादित्य राजयोग, दोन समसप्तक योग असेही काही योग जुळून आलेले आहेत. मृत्यू पंचकात लागणारे हे खग्रास चंद्रग्रहण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तूंचे दान केले, तर शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण...
तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान
मेष: या राशीच्या लोकांनी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात. गरीब किंवा गरजू व्यक्तीला लाल रंगाचे कपडे, डाळ, हरभरा, गूळ इत्यादी दान करू शकता. या गोष्टी दान करणे सर्वोत्तम राहू शकेल.
वृषभ: या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाशी संबंधित वस्तू दान कराव्यात. गरीब किंवा गरजू व्यक्तीला पांढरे कपडे, दूध, दही, तूप इत्यादी दान करू शकता. चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव राहणार नाही.
मिथुन: या राशीच्या लोकांनी मूग डाळ, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या इत्यादी हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे चांगले ठरू शकेल.
कर्क: या राशीच्या लोकांनी तांदूळ, साखर, दही, दूध आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईसारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
सिंह: या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. गरीब आणि गरजू लोकांना पिवळी फळे, पिवळी डाळ आणि पिवळे कपडे दान करू शकता.
कन्या: या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाच्या वस्तू जसे की, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या, हिरव्या डाळी दान कराव्यात.
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
तूळ: या राशीच्या लोकांनी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. दूध, दही, साखर, तूप इत्यादींचे दान करणे सर्वात शुभ ठरू शकेल.
वृश्चिक: या राशीच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे, फळे, डाळी इत्यादी दान करावेत. यामुळे खूप शुभ फळे मिळू शकतात.
धनु: या राशीच्या लोकांनी पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी डाळ, पिवळे कपडे आणि पिवळी फळे दान करणे सर्वोत्तम ठरू शकेल.
मकर: या राशीच्या लोकांनी काळ्या रंगाशी संबंधित वस्तू दान करू शकता. काळी उडीद डाळ, काळी छत्री, काळे तीळ इत्यादी गोष्टी गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करणे चांगले ठरू शकेल.
कुंभ: या राशीच्या लोकांनी काळ्या रंगाशी संबंधित वस्तू दान करू शकता. काळी उडीद डाळ, काळी छत्री, काळे तीळ इत्यादी गोष्टी दान करणे चांगले ठरू शकेल.
मीन: या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. पिवळी फळे, पिवळे कपडे, पिवळे डाळी इत्यादी दान करा. या वस्तू मंदिरात जाऊनही दान करू शकता.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.