Chandra Grahan 2021 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे व त्याचा इथे प्रभाव पडणार आहे का जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:53 IST2021-11-09T16:52:54+5:302021-11-09T16:53:16+5:30
Chandra Grahan 2021: कार्तिक पौर्णिमेला धर्मशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. आंशिक चंद्रग्रहणामुळे भारतातील बहुतांश भागात ते दिसणार नाही. हे फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातच दिसेल.

Chandra Grahan 2021 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी आहे व त्याचा इथे प्रभाव पडणार आहे का जाणून घ्या!
या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आता होणार आहे. याआधी मे महिन्यात चंद्रग्रहण झाले होते. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे ग्रहण कार्तिक पौर्णिमेला होणार आहे.
कार्तिक पौर्णिमेला धर्मशास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. आंशिक चंद्रग्रहणामुळे भारतातील बहुतांश भागात ते दिसणार नाही. हे फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातच दिसेल.
ग्रहणकाळ निषिद्ध मानला जाणार नाही -
हे चंद्रग्रहण आंशिक असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. दुसरीकडे, कार्तिक पौर्णिमेमुळे, या दिवशी लोक गंगेत स्नान करतात, दिवे दान करतात, अन्नदान करतात. या आंशिक ग्रहणामुळे सर्व धार्मिक कार्ये सामान्य पद्धतीने करू शकतील. ज्योतिषशास्त्रानुसार, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, शुक्रवारी हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५. ३३ मिनिटांनी संपेल.
वृषभ राशीवर पडणार प्रभाव
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात थोडी काळजी घेतली पाहिजे. हे ग्रहण भारतात प्रभावी नसले तरी वृषभ राशीवर थोड्या बहुत प्रमाणात प्रभाव पडेल. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी ग्रहणकाळात देवाचे नामस्मरण करावे व ग्रहणकाळ संपल्यावर आवर्जून दान करावे.
२०२१ या वर्षभरात एकूण ४ ग्रहणे आली. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण आहेत. यापैकी १ सूर्यग्रहण आणि १ चंद्रग्रहण झाले आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण १९ नोव्हेम्बर रोजी तर सूर्यग्रहण ४ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे.