Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:42 IST2026-04-10T16:40:29+5:302026-04-10T16:42:35+5:30

Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, घराच्या विनाशाची सुरुवात होण्यापूर्वी निसर्ग 'हे' ५ संकेत देतो, कोणते ते जाणून घ्या  आणि वेळीच बदल करा. 

Chanakya Niti: These 5 symptoms appear in the house before poverty sets in; Recognize the warning given by Acharya Chanakya on time! | Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!

Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!

आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी स्वभावाचे ते उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक महत्त्वाचे सूत्रे सांगितली आहेत. चाणक्यांच्या मते, जर एखाद्या घराची भरभराट थांबणार असेल किंवा विनाशाचा काळ जवळ आला असेल, तर त्या घरात काही विशिष्ट संकेत दिसू लागतात. 

हे ही वाचा : Astro: शनिदेवाचा कोप नाही, तर आशीर्वाद! 'सम योगा'मुळे ११ एप्रिलला 'या' ८ राशींचे 'भाग्यचक्र' वेगाने फिरणार!

चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी त्याच घरात निवास करते जिथे शांतता आणि शिस्त असते. जर तुमच्या घरात खालील गोष्टी घडत असतील, तर ते भविष्यातील संकटाचे लक्षण असू शकते. त्याबद्दल जाणून घेऊ. 

१. सतत होणारे कौटुंबिक कलह (Frequent Quarrels)

ज्या घरात विनाकारण कटकटी, भांडणे आणि ओरडणे सुरू असते, तिथून सुख-समृद्धी कायमची निघून जाते. चाणक्य म्हणतात की, जिथे प्रेम नसतं तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि हळूहळू त्या घराची आर्थिक स्थिती खालावू लागते.

२. ज्ञानी आणि थोरामोठ्यांचा अनादर (Disrespecting Elders)

ज्या घरात वडीलधाऱ्या माणसांचा, शिक्षकांचा किंवा विद्वानांचा अपमान होतो, त्या घराचा विनाश अटळ असतो. थोरामोठ्यांचा आशीर्वाद हे प्रगतीचे मूळ आहे. जर घरात अपमानजनक भाषा वापरली जात असेल, तर लक्ष्मी देवी अशा घराचा त्याग करते.

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर

३. अन्नाचा अपव्यय (Waste of Food)

अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि त्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते. जर तुमच्या घरात अन्नाचा अपमान होत असेल, जेवण फेकून दिले जात असेल किंवा अन्नाची नासाडी होत असेल, तर समजून जा की वाईट दिवस दूर नाहीत. अन्नाची बचत करणे म्हणजे भाग्याची बचत करणे होय.

४. तुळस किंवा झाडे सुकणे (Drying of Plants)

चाणक्य नीतीनुसार, घरातील हिरवीगार झाडे किंवा तुळशीचे रोप अचानक सुकू लागणे हे वास्तूमध्ये नकारात्मकता वाढल्याचे लक्षण आहे. विशेषतः तुळस सुकणे हे बुध ग्रहाच्या खराब स्थितीचे आणि आगामी आर्थिक संकटाचे प्रतीक मानले जाते.

हे ही वाचा : Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!

५. पैशांचा अपव्यय आणि चुकीचा मार्ग (Waste of Money)

कष्टाने कमावलेला पैसा जर विनाकारण चैन-विलास, जुगार किंवा चुकीच्या कामात खर्च होत असेल, तर ते कुटुंबाच्या नाशाचे प्रमुख कारण ठरते. पैसा टिकवण्यासाठी तो योग्य मार्गाने कमावणे आणि जपून वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title : चाणक्य नीति: घर में गरीबी आने से पहले दिखते हैं ये 5 संकेत।

Web Summary : चाणक्य नीति आर्थिक पतन के संकेतों के बारे में चेतावनी देती है: पारिवारिक झगड़े, बड़ों का अनादर, भोजन की बर्बादी, पौधों का मुरझाना और धन का दुरुपयोग। ये नकारात्मक संकेत लक्ष्मी के प्रस्थान और आने वाली कठिनाई का संकेत देते हैं।

Web Title : Chanakya Niti: 5 signs of impending poverty in a home.

Web Summary : Chanakya Niti warns of signs indicating financial decline: family quarrels, disrespecting elders, wasting food, dying plants, and misusing money. These negative indicators suggest Lakshmi's departure and approaching hardship.