शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Chaitra Navratra 2021: देवी सतीच्या ५१ शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ पाकिस्तानातआहे, वाचा सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:33 IST

Chaitra Navratra 2021: सात बेटांवर वसलेल्या देवी रात्री एकत्र जमून रास खेळतात आणि पहाटे हिंगलजा देवीच्या गुहेत येऊन विश्रांती करतात. 

सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. अशा काळात सर्व शक्तिपीठांवर देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते. असेच एक सती शक्तीपीठ पाकिस्तानात स्थित आहे. बलुचिस्तान येथील हिंगोल नदीच्या काठावर हिंगलाज नावाची पर्वतरांग आहे. त्या पर्वतांच्या कुशीत हिंगलजा देवीचे मंदिर विसावले आहे. त्याला नानी मंदिर असेही म्हटले जाते. या मंदिराची गणना ५१ शक्तिपीठांमध्ये केली जाते. स्थानिक मुस्लिम आणि राजस्थानादी प्रांतात त्या देवीचे भरपूर भक्तगण आहेत. 

मंदिर प्राकृतिक गुहेत स्थित आहे. तिथे मानवनिर्मित मूर्ती नसून देवीचे प्रतीकात्मक रूप आहे. तिथे छोट्या आकाराच्या शिळा आहेत. त्याला शेंदूर लेपन केले आहे. शेंदुराला संस्कृतात हिंगुला म्हणतात. त्यावरूनही देवीचे नाव हिंगलजा पडले असावे. त्या प्रतीकात्मक रूपाची मनोभावे पूजा केली जाते. 

हिंगलाज मंदिराजवळ गणपती, माता काली, गुरुगोरख नाथ दूनी, ब्रह्म कुध, तिर कुण्ड, गुरुनानक खाराओ, रामझरोखा बैठक, चोरसी पर्वतावर अनिल कुंड, चंद्र गोप, खारिवर  आणि अघोर पूजा अशी अनेक अध्यात्मिक क्षेत्र आहेत. 

या देवीच्या उत्पत्ती कथेबद्दल निश्चित माहिती नाही. परंतु एका छंदात वर्णन केले आहे, सातो द्वीप शक्ति सब रात को रचात रास।प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में॥याचा अर्थ असा, की सात बेटांवर वसलेल्या देवी रात्री एकत्र जमून रास खेळतात आणि पहाटे हिंगलजा देवीच्या गुहेत येऊन विश्रांती करतात. 

एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर देवी सतीचे पार्थिव घेऊन त्रैलोक्यात भ्रमण करत होते, तेव्हा भगवान विष्णूंनी तिला ५१ खंडांमध्ये विभक्त केले. देवीचे अंश ज्या ठिकाणी पडले, ती स्थाने शक्तीपीठ म्हणून गौरवली जाऊ लागली. देवीचे ब्रह्मरंध्र अर्थात शीर हिंगलजा येथे पडले, तेही शक्तीपीठ झाले. 

नवसाला पावणारी देवी, असा या देवीचा लौकिक आहे. म्हणून हिंदूच काय, तर स्थानिक इस्लामी लोकदेखील देवीकडे संरक्षण कवच म्हणून पाहतात व पूजा करतात. महाराष्ट्रात हिंगलजा देवीशी जुळणारी गडहिंगलज, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव, शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसतात. 

टॅग्स :Navratriनवरात्री