शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Makar Rashi Bhavishya 2022: मकर रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात आनंदमय, मध्य अनुकूल; साडेसातीचा कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 11:32 IST

Makar Rashifal 2022: मकर राशीच्या व्यक्ती सन २०२२ वर्षाच्या शेवटी अडथळे, समस्या आणि त्रास दूर होतील. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात कशी असेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष मकर राशीसाठी अनुकूल असेल, असे सांगितले जात आहे. मकर राशीच्या लोकांना शेवटची अडीच वर्षांची साडेसाती सुरु होणार आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीच काळ तुमच्यासाठी आनंददायी असेल. परंतु वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही संयमाने वागावे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. २०२२ या वर्षाच्या शेवटी तुम्ही तुमचे अडथळे, समस्या आणि त्रास मुळापासून सोडवू शकाल.

मकर राशीच्या लोकांसाठी सन २०२२ ची सुरुवात म्हणजेच जानेवारी महिना चांगला राहील. या काळात शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल. त्याचबरोबर जानेवारी महिन्यातच संपूर्ण वर्षासाठी आपल्या खर्चाचे नियोजन आणि पैशाची बचत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला आपल्या जवळच्या आणि प्रियजनांवर पैसे खर्च करावे लागतील. मकर राशीच्या लोकांसाठी जोडीदाराच्या दृष्टीने फेब्रुवारी आणि मार्च सुखद राहण्याची अपेक्षा आहे. तसेच या काळात जे लोक अविवाहित आहेत, त्याचे विवाह योग जुळून येण्याची शक्यता आहे. तुमचे आचरण आणि समज या काळात तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीकडे नेऊ शकते. फेब्रुवारीमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात करिअर वाढीच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात, पण निष्काळजीपणा केल्यास त्या गमावू शकता.

मकर राशीच्या लोकांसाठी मे आणि जून महिना जोडीदाराच्या दृष्टीने अनुकूल राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे प्रियकर/प्रेयसीसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. अनेक मकर राशीचे लोक या काळात त्यांचे प्रेम जीवन वैवाहिक जीवनात रूपांतरित करण्याचा विचार करू शकतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये, तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणण्यासाठी उपाय शोधण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान, आपल्या आहाराची काळजी घ्या. वर्षाच्या अखेरीपर्यंत तुम्हाला फायदे मिळू शकतात. मकर राशीच्या लोकांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकेल. करिअर किंवा नोकरी बदलण्यास इच्छुक असलेल्यांना संधी मिळतील. वर्षाच्या शेवटी, तुम्ही तुमच्या प्रवासावर किंवा सुट्टीवर पैसे खर्च कराल. मात्र, असे करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. वेळेचा सदुपयोग करताना योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यास लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

एकंदरीत, या वर्षी मकर राशीचे लोक त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर अनेक यश संपादन करण्यात यशस्वी होऊ शकतात. तुमच्यावर कामाचा बोजा जास्त असण्याची शक्यता असली, तरी भविष्यात तुम्हाला त्याचा फायदाही मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. या वर्षी लक्ष केंद्रित करून तुमची कार्य कौशल्ये सुधारण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यात यशस्वी होऊ शकता.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य