Buddha Purnima 2025: बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांना प्रिय असलेल्या १३ नियमांचे पालन करूया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:59 IST2025-05-10T13:58:39+5:302025-05-10T13:59:21+5:30
Buddha Purnima 2025: यंदा १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे, ही भगवान बुद्धांची जन्मतिथी; ती साजरी करण्यासाठी त्यांना प्रिय असलेल्या गोष्टींचे पालन करूया.

Buddha Purnima 2025: बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांना प्रिय असलेल्या १३ नियमांचे पालन करूया!
असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. भारत आणि जगात बरीच संयुक्त मंदिरे आहेत जी भगवान बुद्ध आणि विष्णू यांना समर्पित आहेत. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. चला उत्सवाची परंपरा जाणून घेऊया. यंदा १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमा(Buddha Purnima 2025) आहे.
१. भगवान बुद्ध यांचा जन्मदिन म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खीर केली जाते आणि खीर भगवान बुद्धांना अर्पण केली जाते.
२. आजच्या दिवशी बौद्ध प्रार्थना स्थळ फुलांनी सजवले जाते व बौद्ध प्रार्थनांचे आयोजन केले जाते.
३. सूर्योदयाच्या अगोदर प्रार्थना स्थळांवर सर्व अनुयायी एकत्र जमतात. भजन, वाचन, गायन करून जयंती साजरी करतात.
४. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर बौद्ध प्रार्थना स्थळांवर बौद्ध ध्वज फडकविला जातो. हा ध्वज निळा, लाल, पांढरा, पिवळा आणि केशरी रंगाचा असतो. लाल आणि निळा रंग आशीर्वादाचा, पांढरा रंग धर्म शुद्धतेचे प्रतीक, केशरी रंग बुद्धिमत्तेचे प्रतीक आणि पिवळा रंग कठीण परिस्थितीतून जगण्याचे प्रतीक मानला जातो.
५. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी अनेक गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र दान केले जाते.
६. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काहीजण पक्षी व पिंजऱ्यात कैद असलेल्या प्राण्यांना मुक्त करून हा दिवस साजरा करतात.
७. या दिवशी भगवान बुद्ध यांचे अनुयायी घरात दिवे लावतात आणि घर फुलांनी, दीपमाळांनी सजवले जाते.
८. जगभरातील बौद्ध अनुयायी आजच्या दिवशी बोधगया येथे जातात आणि प्रार्थना करतात.
९. भगवान बुद्ध यांच्या चरित्राचे त्यांच्या शिकवणुकीचे सामूहिक वाचन, चिंतन करतात.
१०. आजच्या दिवशी भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून आजच्या दिवशी बोधी वृक्षाचे पूजन केले जाते.
१२. भगवान बुद्धांचे अनुयायी आजच्या दिवशी मांसाहार व्यर्ज करतात. कारण भगवान बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होते.
१३. आजच्या दिवशी बौद्ध धर्मगुरुंकडून सर्व अनुयायांना भगवान बुद्धांनी दिलेल्या शांतिमय जीवनाचे स्मरण करुन दिले जाते आणि त्यांनीही शांततेचा मार्ग अनुसरावा अशी शिकवण दिली जाते.