शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
3
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "मराठा समाजासाठी जे करता येईल ते केलं आणि यापुढे करु"; आंदोलनावर एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका
5
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
6
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!
7
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
8
३० KM मायलेजसह लवकरच लॉन्च होणार Maruti Fronx Hybrid, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...
9
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
10
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
11
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
12
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
13
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
14
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
15
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
16
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
17
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
18
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
19
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
20
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?

Balaram Jayanti 2025: श्रावणात कृष्णाची तर भाद्रपद षष्ठीला केली जाते बलराम जयंती; त्यांच्याबद्दल सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 07:05 IST

Balram Jayanti 2025: राम अवतारात धाकटा भाऊ म्हणून लक्ष्मणाने अनेक हाल सोसले, म्हणून कृष्ण अवतारात त्याला बलराम नावाने मोठ्या भावाचा मान मिळाला, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.

>> रोहन विजय उपळेकर

आज भाद्रपद शुद्ध षष्ठी, भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलरामांची जयंती(Balram Jayanti 2025)! भगवान श्रीकृष्ण व त्यांचेच अंश असणारे भगवान शेषांचे अवतार भगवान श्रीबलराम हे जगाच्या कल्याणासाठी अवतरले होते. देवकीमातेचा सातवा गर्भ श्रीभगवंतांच्या योगमायाशक्तीने देवकीच्या गर्भातून काढून गोकुळात राहणा-या वसुदेवांच्या दुस-या पत्नीच्या, रोहिणीमातेच्या गर्भात स्थापन केला होता. तेच रोहिणी-वसुदेवांचे पुत्र भगवान बलराम होत. देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे शेषांना 'संकर्षण' म्हणतात. त्यांनी लोकांचे रंजन केले म्हणून त्यांना 'राम' म्हणतात आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्याने त्यांना 'बल' असेही म्हणतात. नांगर हे त्यांचे आयुध असल्याने त्यांना 'हलधर' किंवा 'हलायुध' देखील म्हणतात. आपल्या बलाचा अतिशय नेटकेपणे व चांगल्याच कार्यासाठी, सात्त्विक गोष्टींसाठीच ते सदैव वापर करतात म्हणून त्यांना 'बलभद्र' असेही म्हणतात.

श्रीबलराम नावाप्रमाणेच अत्यंत बलवान होते. ते युद्धनीती, मल्लविद्या, मुष्टियुद्ध आदी विद्यांचे महान ज्ञाते मानले जातात. दक्षिण भारतामध्ये श्रीविष्णूंच्या दशावतारांमध्ये नवव्या बुद्धावताराच्या जागी भगवान बलरामांचीच गणना होते. 'द्वापरे रामकृष्णायां' या श्लोकातूनही बलराम-श्रीकृष्णांनाच द्वापर युगातील अवतार म्हटलेले आहे.

वैष्णव संप्रदायांमध्ये 'चतुर्व्यूह' अशी एक संकल्पना आहे. श्रीरामोपासक वैष्णव श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न यांना चतुर्व्यूह म्हणतात तर श्रीकृष्णोपासक श्रीकृष्ण, बलराम, प्रद्युम्न व अनिरुद्ध यांना चतुर्व्यूह म्हणतात. ह्या चारही रूपात भगवंतच साकारलेले आहेत, अशी वैष्णवांची धारणा आहे. परमपावन श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रात 'चतुर्व्यूह' (नाम क्र.१३८), 'भुजगोत्तम' (१९३), 'धरणीधर' (२३५) 'संकर्षणोऽच्युत' (५५२), 'हलायुध' (५६२), 'धराधर' (७५६), 'चतुर्व्यूह' (७६७), 'अनन्त' (८८६) इत्यादी नामांमधून भगवान शेषस्वरूप श्रीबलरामांचाच उल्लेख करण्यात आलेला आहे. [ http://rohanupalekar.blogspot.in ]

श्रीभगवंतांनी अघासुराचा उद्धार केल्यानंतर ब्रह्मदेव चिडले. कारण देवांनी प्रत्यक्ष पापाचाच उद्धार केला होता. त्यावेळी ब्रह्मदेवांनी गोपबालक व गाई-वासरे अदृश्य करून गुहेत नेऊन ठेवली. तेव्हा त्यांचा गर्व हरण करण्यासाठी श्रीभगवंतांनी स्वत:पासून सर्व पुन्हा निर्माण केले. तेच त्या सर्वांच्या रूपात नटले व असे वर्षभर त्यांची लीला चालू होती. त्यावेळी केवळ श्रीबलरामांनाच कळले की ही गायीवासरे वेगळी आहेत. कारण भगवान बलराम हे साक्षात् श्रीकृष्णांचेच अंश होते. गोकुळातल्या इतर कोणालाही देवांची ही लीला कळली नाही.

भगवान श्रीकृष्ण रंगाने सावळे व पीतांबर धारण करीत तर श्रीबलराम गौरवर्णाचे व नीलांबर धारण करीत. सर्व गोपबालक या दोन्ही अवतारांसोबत अत्यंत आनंदित होऊन व्रजात गोचारणादी लीला-क्रीडा करीत असत. श्रीबलरामांचा विवाह आनर्त देशाच्या रैवत नावाच्या राजाच्या रेवती नामक कन्येशी झालेला होता. दुर्योधन हा बलरामांचा युद्धशास्त्रातला शिष्य होता. त्यांना आपली बहीण सुभद्रेचे त्याच्याशी लग्न लावून द्यायचे होते. पण श्रीकृष्णांना ते मान्य नसल्याने, त्यांनी अर्जुनाला त्रिदंडी संन्यास घ्यायला लावून सुभद्रेचे अपहरण करायला लावले व त्यांचा विवाह लावून दिला. महाभारत युद्धाच्या काळात बलराम तीर्थयात्रेला निघून गेले होते. त्यांनी युद्धात भाग घेतला नव्हता. भगवान बलरामांच्याही अशा अनेक लीलांचे सुरेख वर्णन श्रीमद् भागवतील दशमस्कंधात आलेले आहे. मोक्षपुरी द्वारकेमधील श्रीद्वारकाधीश मंदिराच्या आवारातच भगवान श्रीबलरामांचेही सुरेख मंदिर आहे. तेथील श्रीबलरामांची श्रीमूर्ती अतीव देखणी आहे. श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी येथेही श्रीबलभद्रांचा सुरेख विग्रह आहे.

भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचेच स्वरूप आणि प्रधान लीलासहचर असणा-या भगवान श्रीबलरामदादांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त साष्टांग दंडवत !

टॅग्स :Indian Festivalsभारतीय उत्सव-सण