खरं सूख कशात आहे...? बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं, आपण किती सुखी? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:10 IST2025-02-19T18:10:04+5:302025-02-19T18:10:44+5:30
धीरेंद्र शास्त्री छत्रपूरमधील बालाजी हनुमान मंदिराजवळ 'दिव्य दरबार' आयोजित करत असतात. त्यांच्या या दरबारात लोक लाबून लांबून येत असतात. यावेळी, भाविकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धीरेंद्र शास्त्री स्पष्टपणे उत्तर देत असतात. त्यांना एकदा, खरे सुख कशात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी काय उत्तर दिले, बघूया...

खरं सूख कशात आहे...? बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितलं, आपण किती सुखी? जाणून घ्या
भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या काही संतांपैकी एक म्हणजे, बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री. ते मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील गढा या गावचे रहिवासी आहेत. ते अगदी परदेशातही तेवढेच लोकप्रियत आहेत. धीरेंद्र शास्त्री छत्रपूरमधील बालाजी हनुमान मंदिराजवळ 'दिव्य दरबार' आयोजित करत असतात. हे ठिकाण बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या दरबारात लोक लाबून लांबून येत असतात. यावेळी, भाविकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना धीरेंद्र शास्त्री स्पष्टपणे उत्तर देत असतात. त्यांना एकदा, खरे सुख कशात आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी काय उत्तर दिले, बघूया...
जेव्हा बागेश्वरधामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना, 'खरे सुख काशात आहे?' असे विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणतात, “जे आहे ते पुरेसे आहे. जे मिळाले आहे, ते कमी नाही. जे मिळाले नाही, त्याचे दुःख नाही. जे मिळेल, ते एक स्वप्न आहे आणि जे मिळाले आहे ते अद्भुत आहे, असे मानण्यात खरे सुख आहे.” ते म्हणतात, माणसाने आपली व्याप्ती मर्यादित ठेवायला हवी. त्याच्याकडे जे काही आहे, त्यात त्याने आनंदी राहायला हवे."
भगवद्गीतेचे अध्ययन कसे करावे हे आजोबांनी शिकवले -
धिरेंद्र शास्त्री म्हणतात, आपले आजोबा एक सिद्ध संत होते. ज्यांचे नाव भगवानदास गर्ग असे होते. ते निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. ते दर्बारही लावत होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे आपल्या आजोबांना गुरु मानत. त्यांनीच त्यांना रामायण आणि भागवत गीतेचा अभ्यास करायला शिकवले"