शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 21:14 IST

Baba Vanga And Nostradamus Prediction: बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांनी केलेली भविष्यवाणी चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले जात आहे.

Baba Vanga And Nostradamus Prediction: गेल्या अनेक महिन्यांपासून जग अशांततेच्या गर्तेत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धापासून सुरू झालेला विनाश आता इराण-इस्रायलयुद्धाने अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेली अनेक वर्ष रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. परंतु, त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही. यातच इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली आहे. तर इस्रायलने आता रशियाला मदतीसाठी आवाहन केले आहे. ही सगळी स्थिती तिसऱ्या महायुद्धाकडे जाताना दिसत असल्याचे अनेक दावे केले जात आहेत. यातच बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांनी केलेली भविष्यवाणी चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले जात आहे. 

एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच इस्रायलने हमासवर जोरदार हल्ले केले. याचे रुपांतरही मोठ्या युद्धात होणार अशी चिन्हे होती. यातच पाकने पहलगाम येथील पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होऊ शकते, असे दावे केले जात होते. परंतु, युद्धबंधी करण्यात आली. या घडामोडींनी जग काहीसे शांत होताना दिसत असतानाच इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाला तोंड फुटले. यात अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने उडी घेतली. तर आता इराणच्या बाजूने रशिया युद्धात उतरू शकतो, असा कयास बांधला जात आहे. 

जुलै महिन्यातील ग्रहस्थिती आणि अशुभ योग काय सांगतात?

जेव्हा कोणतीही मोठी आपत्ती येते, तेव्हा ती अमावस्या आणि पौर्णिमेच्या आसपास येते. तसेच अशा प्रकारची नैसर्गिक किंवा कोणतेही संकट येणार असते, तेव्हा शनि, मंगळ, गुरू, राहु हे ग्रह केंद्र किंवा त्रिकोणात स्थित असतात. अशा वेळेस काही मोठी घटना घडण्याची शक्यता असते. ५ जुलै रोजी चंद्र तूळ राशीत असेल आणि गुरूची चंद्रावर दृष्टी असेल. त्याच वेळी, २४ जुलै रोजी मंगळ आणि केतू एकाच अंशावर राहून युती करत आहेत, तर बुध आणि चंद्र यावेळी कर्क राशीत आहेत. तर शनि मीन राशीत आहे. आताच्या घडीला शनि आणि मंगळाचा अशुभ असा षडाष्टक योग सुरू आहे. तसेच मंगळ आणि केतु यांचाही प्रतिकूल योग सुरू आहे. मंगळ २८ जुलै २०२५ रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर हे अशुभ योग समाप्त होतील. परंतु, पुढील महिनाभर हे अशुभ योग कायम राहणार असून, याचा जगावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. 

बाबा वेंगा यांचे भाकित काय?

बाबा वेंगा यांनी २०२५ बद्दल केलेले भाकीत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. जगावर अनेक मोठी संकट येतील. युरोपमध्ये मोठा संघर्ष सुरू होईल, त्यानंतर हा संघर्ष हळूहळू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेईल, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल, असे भाकित बाबा वेंगा यांनी वर्तवले होते. जगभरात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बाबा वेंगा यांचे हे भाकित खरे ठरणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी भयानक भूकंप, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा इशाराही दिला होता. अनेक ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ७ जुलैपासून ते २८ जुलैपर्यंत खप्पर योग, षडाष्टक योग सारखे अनेक खतरनाक योग तयार होत आहेत. त्यामुळे आता तिसरे महायुद्ध होणार का? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. याबाबतचे अनेक दावे व्हायरल होताना दिसत आहेत.

नास्त्रेदमस यांची भविष्यवाणीही व्हायरल

सध्या सोशल मीडियावर नास्त्रेदमस यांची भविष्यवाणीही व्हायरल होत आहे. या भविष्यवाण्यांमध्ये असे म्हटले आहे की, २०२५ मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. नास्त्रेदमसच्या प्रसिद्ध पुस्तक 'लेस प्रोफेटीज'चा हवाला देत असा दावा करण्यात आला आहे की, २०२५ मध्ये जग एका भयानक युद्धाच्या विळख्यात सापडू शकते. ज्यामुळे भयानक विनाश होऊ शकतो. यामुळे लाखो लोक प्रभावित होऊ शकतात. या युद्धामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल आणि मानवतेला गंभीर संकटातून जावे लागू शकते. या पुस्तकात कोणत्याही विशिष्ट देशाचे नाव घेतलेले नसले तरी, अलीकडच्या काळात झालेल्या भारत-पाक लष्करी संघर्षाचा आणि चीन आणि तुर्की यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तसेच इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा विचार करता, याबाबतची भविष्यवाणी खरी होईल की काय, असा चिंता व्यक्त केली जात आहे. २०२५ साठी नास्त्रेदमसची ही भविष्यवाणी खरोखरच भयावह आहे. जर ती खरी ठरली तर जगात विनाश होईल, अर्थव्यवस्था कोलमडायला लागेल. संपूर्ण जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. समाजात अशांतता पसरेल, असे म्हटले जात आहे. 

- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषwarयुद्धIranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया