शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

Astrology Tips: लग्न मुहूर्ताची वेळ पाळणे का आवश्यक असते? जाणून घ्या लग्नघटिकेचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 09:56 IST

Importance of Marriage Muhurat: 'शुभ मंगल सावधान' म्हटल्यावर मंगलाष्टक सुरू होऊन मुहूर्तावर लग्न लावण्याकडे गुरुजींचा कल असतो, आपणही त्यासाठी आग्रही असले पाहिजे, कारण... 

सध्या लग्नसराई सुरू आहे. वाजत गाजत वरात निघत आहे. सजून धजून लोक लग्नाला जात आहेत. जेवणाच्या पंगतीच्या पंगती उठत आहेत. अशातच महत्त्वाचा सोहळा असतो तो म्हणजे लग्नघटिकेचा! नियोजित शुभ मुहूर्तावर लग्न लावण्याबाबत गुरुजी आग्रही असतात, मात्र मेक अप, पाहुणे, फोटोसेशन या नादात आपण मुहूर्त पुढे मागे गेला तरी निष्काळजीपणे वागतो! पण त्या लग्न घटिकेला अतिशय महत्त्व असते. कारण ती घटिका त्या क्षणी ग्रहमानाची अनुकूलता पाहून ठरवलेली असते. ती पाळली गेली नाही तर काय होऊ शकते याबद्दल जाणून घेऊ. 

श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीनुसार बालपणापासून गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात राहून शिकत होते. केवळ शिक्षण नाही, तर गुरुंच्या आश्रमातील झाडलोट, इतर कामेदेखील सर्वांना समानरित्या करावी लागत असत. त्याबरोबरीने विविध शास्त्रांचेही प्रशिक्षण सुरू होते.

एक दिवस, गुरुंजवळ बसून अध्ययन करत असताना आश्रमाबाहेरून वाजत गात एक मिरवणुक जात होती. लक्ष्मणाने कुतुहलाने बाहेर डोकावत गुरुजींना विचारले, `गुरुजी ही मिरवणुक कसली?'

गुरुजी रागावले, म्हणाले, `अभ्यास करताना अन्य गोष्टींकडे लक्ष जाता कामा नये.' तरीदेखील लक्ष्मणाबरोबरच सर्वांचेच कुतुहल जागे झाले. अगदी प्रभुु रामचंद्रांचेसुद्धा! गुरुजी म्हणाले, `इथे शिकून तुम्हाला १८ वर्षे होत आली, तरी तुम्ही एवढे अज्ञानी कसे? ही विवाहाची मिरवणुक आहे, एवढेही तुम्हाला कळत नाही का?'

आणखी एका शिष्याने पुढे विचारले, `गुरुजी विवाह म्हणजे काय?'

गुरुजी म्हणाले ठिक आहे, `याचे तुम्हाला प्रात्यक्षिकच घडवतो. उद्या मिथिला नगरीत जानकीचे स्वयंवर आहे. तिथे जाऊन तुम्ही स्वत:च बघा.'

असे म्हणत विश्वामित्र दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यांसह मिथिला नगरीत आले. तिथे स्वयंवरासाठी भला मोठा मांडव घातला होता. मांडवाच्या एका बाजूला उच्च आसनावर राजा जनक, गुरुवर्ग आणि राजदरबारातील समस्त स्त्रीवर्ग स्थानापन्न झाला होता. एका झिरमिळत्या, चकचकीत पडद्याआड जानकीदेखील बसली होती. स्वयंवरासाठी आलेल्या देशोदेशीच्या राजकुमारांकडे चिकाच्या पडद्याआडून पाहत होती. रावणाला पाहून ती घाबरली. तिने आपल्या आईला म्हणजे, पृथ्वीमातेला सांगितले, `काहीही झाले, तरी रावणाच्या हातून शिवधनुष्य तुटू देऊ नकोस.' 

स्वयंवराला सुरुवात झाली. रावण आपणहून उठला आणि अहंकाराच्या भरात त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, तसा तो धारातिर्थी पडला. दहा प्रयत्नानंतरही त्याच्याकडून धनुष्य उचचले जाईना. रावणाचे हे हाल, तर आपले काय, अशा विचाराने बाकीचे राजकुमार जागचे उठलेही नाहीत. लग्नघटीका टळून गेली. ते पाहून जनक राजा अस्वस्थ झाला आणि त्याने सभेत विचारले, `इते एकही वीरपुरुष नाही का? जो हे शिवधनुष्य पेलू शकेल? त्याच्याच हाती माझी कन्या जानकीचा हात देण्याचा मी निश्चय केला आहे.'

तेव्हा गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र उठले. त्यांनी शिवधनुष्याला नमस्कार केला आणि एका दमात धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडली. क्षणार्धात धनुष्य मधोमध मोडले. त्याचा प्रचंड आवाज झाला. त्या वीरपुरुषाला आपली जानकी सोपवण्यासाठी जनकाने कारवाई केली आणि प्रभु रामचंद्राचा आणि सीतेचा विवाह लागला. 

मात्र, हा विवाह मुहूर्त टळून गेल्यावर लागल्यामुळे त्या द्वयींच्या वाट्याला संसार लाभूनही संसारसुख लाभले नाही. म्हणून लग्न मुहूर्ताला अतिशय महत्त्व आहे. मंगलाष्टकातही `आली समीप लग्नघटिका' असे म्हणतो, कारण तो मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रहदिशांची अनुकुलता पाहून सुनिश्चित केलेला असतो. लग्न मुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली, तर त्याचे परिणामही शुभ मिळतात. म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हयगय न करता, नेमून दिलेल्या मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न करावा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३