शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:42 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग २

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

आपले आयुष्य १२० वर्षाच्या कालखंडाचे धरून त्यात प्रत्येक ग्रहाला ठराविक कालावधी दिलेला आहे.  त्या कालखंडात तो ग्रह आपल्या आयुष्याचा लगाम त्याच्या हाती घेत असतो. जसे रवीला ६ वर्ष , मंगळाला ७ वर्ष, राहू १८ वर्ष अशाप्रकारे असलेल्या ह्या कालखंडाला त्या ग्रहाची “ महादशा“ असे संबोधले आहे. प्रत्येक ग्रहाच्या दशेचा कालखंड ठरलेला आहे.  त्या काळात मूळ पत्रिकेत त्या ग्रहाची स्थिती कशी आहे, ग्रह कुठल्या भावाचा कार्येश आहे आणि कुठल्या नक्षत्रात आहे, त्याचा नक्षत्र स्वामी कुठे आहे, ह्या सर्व भावांशी संबंधित गोष्टींच्याबाबत काहीतरी फळे मिळणारच. ह्या महादशेत इतर सर्व ग्रहांच्या अंतर्दशा , विदशा सुद्धा येतात. त्यामुळे महादशा या शब्दाची धास्ती घेण्याचे कारण नाही. 

Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!

घटना घडायची, ती कधी आणि कशी घडेल ह्याचा संपूर्ण अधिकार महादशा स्वामीकडे राखून ठेवलेला आहे त्यात काहीही बदल करता येत नाही. आज आपण विवाह ह्या विषयावर चर्चा करत असताना दशांबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे. विवाह होण्या साठी पत्रिकेतील 2, 7, 11 हे भाव महत्वाचे आहेत. द्वितीय भाव, कारण कुटुंबात एका नवीन व्यक्तीचे आगमन म्हणजेच कुटुंब वृद्धी , सप्तम भाव हा पती आणि पत्नीच्या मनोमिलनाचा आहे, तसेच विवाह करून लाभ होणार म्हणून 11 व्या स्थानातील लाभ भावसुद्धा महत्वाचा. ह्या तिन्ही भावांशी निगडीत असणार्‍या दशा ह्या विवाह घटना घडवण्यासाठी पूरक ठरतात . ह्या विरोधात 1, 6, 10 ह्या भावांच्या दशा असतात . 

साधारणपणे शैक्षणिक दशा संपली की नोकरी आणि मग छोकरी असे समीकरण धरले तर साधरण वय २८ नंतर विवाहाची दशा जर 2, 7, 11 भावांशी अनुकुलता दर्शवत असेल तर विवाह होतो. एखाद्यावेळी राहू, शनी, गुरु, बुध ह्या ग्रहांच्या मोठ्या दशा आल्या आणि ग्रह जर षष्ठ भावाची फळे देत असेल किंवा षष्ठ भावाचा एकमेव कार्येश असेल तर अशावेळी कितीही प्रयत्न केले तरी विवाह जुळून येत नाही. षष्ठ भाव हा सप्तमाचा व्यय असल्यामुळे विवाह होत नाही किंवा मोडतो. अष्टम भावाची दशा अंतर्दशा असेल तर पती पत्नी भांडत राहतील पण विवाह मोडणार नाही . दशास्वामी 3, 9 आणि ६ भाव दर्शवत असेल तर त्यांच्या दशा अंतर्दशेत कायदेशीर घटस्फोट होण्याची शक्यता असते. 

संसारात अनेक चढ उतार येतातच . कधी आर्थिक समस्या निर्माण होतात तर कधी वैचारिक मतभेद . एकदा एका व्यक्तीने मला सांगितले आमचे अजिबात पटत नाही . मी विचारले कारण काय असते वादाचे ? त्यावर म्हणाले आमच्यात क्षुल्लक कारणे असतात उदा. रस्ता कुठून ओलांडायचा त्यावरून पण आमच्यात मतभेत होतात .मला खरच हसू आले. असो, पण आहे हे असे आहे . अनेकदा दोन्हीकडील वडील मंडळीसुद्धा त्या दोघांच्या संसारात नको तितकी लुडबुड करतात आणि म्हणून वादाला तोंड फुटते.

Numerology: जूनमध्ये लागणार बंपर लॉटरी! अडकलेले पैसे परत येतील, कमाईचे नवे मार्ग सापडतील!

अनेकदा वयाची पन्नाशी आली तरी विवाहाला अनुकूल दशाच येत नाही आणि सनईचे सूर , मंगलाष्टके कानी पडणे कठीण होते . आपला आजचा जन्म हा पूर्व जन्माशी निगडीत असल्यामुळे पूर्व जन्मातील अनेक चांगल्या वाईट कर्मांचे फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. विवाहासाठी दशा आणि सोबत चंद्र , रवी , शुक्र गुरु, मंगळ हेही बघावे लागतात. रवी आणि गुरुचे गोचर भ्रमण अनुकूल असावे लागते. थोडक्यात काय तर दशा स्वामीची संमती घेतल्याशिवाय विवाह ठरत नाही आणि संपन्न सुद्धा होत नाही.

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप