शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:19 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ७

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

मागच्या लेखात आपण पाहिले, की मंगळ असलेल्या मुलाला किंवा मुलीला मंगळाचाच जोडीदार लागतो की त्याला अनुकूल ग्रहस्थितीतला जोडीदार चालतो...या लेखात पत्रिकेतील मंगळाबद्दल अधिक जाणून घेऊया. 

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

पुरुषाला वैवाहिक सुख हे शुक्रावरून पहिले जाते तसेच स्त्रीसाठी मंगळ आणि गुरु महत्वाचे आहेत .शुक्र शनी युती असेल तर अनैतिकता होत नाही. स्वतःवर संयम असतो . स्त्री पत्रिकेत मंगळावर गुरूची दृष्टी असेल तर सहसा चारित्र चांगले असते. पुरुषाच्या पत्रिकेत मंगळ शुक्र युती ही मैत्रीसाठी हात पुढे करायला थोडे धाडस देते. मंगळ शुक्र कामवासना अधिक करू शकतात. बुध हा थोडा नपुंसकतेकडे नेणारा आहे. बुध हा पैशाचा ग्रह आहे. शुक्र, राहू हा भोग भोगवणारा, तर शुक्र राहू हा निरसता निर्माण करतो. 

शुक्र चांगला असतो त्या स्त्रीच्या अंगावर हिऱ्याचे दागिने असतात .अन्न ,वस्त्र निवारा आणि बुटी पार्लर ह्या तिच्या मुख्य गरजा असतात . स्त्रीच्या पत्रिकेत शुक्र शनी युती छानछोकीची आवड देणार नाही. समाजातील उच्च वर्तुळातील स्त्रिया बघा. शुक्र राहू फॅशनमागे धावणारे असतात . शुक्र रवी असेल तर नवरा कमावणारा असतो आणि त्याच्या पदामुळे तिला मान मिळतो. गुरु शुक्र पुरुषांच्या पत्रिकेत जितका वाईट जातो तितका स्त्री च्या पत्रिकेत जात नाही .स्त्रीचे वैवाहिक जीवन हे मुख्यत्वे मंगळावर अवलंबून असते. गुरूमुळे वैवाहिक सुख तर मंगळामुळे जोडीदार समजतो. स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ हा सप्तमेश किंवा गुरूच्या दृष्टीत असेल तर वैवाहिक सौख्यात हानी होताना दिसते. मंगळ ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून दर्शवलेल्या नातेसंबंधपासून  कटकटी, भांडणे, वितुष्ट येते .

अग्नितत्वाच्या राशीत मंगळ असेल तर स्फोटकता अधिक असेल. पृथ्वितत्वाच्या राशीत असेल तर चांगली फळे देईल, वायुतत्वाच्या  राशीतील मंगळ हा वणवा पेटल्या सारखा असतो. पंचमावर मंगळाची  दृष्टी असेल तर पाळीचा त्रास ,गर्भाशयाची सर्जरी होते.  मंगळ लाभात असेल तर मित्रांमध्ये भांडणे होतील. लग्नात असेल तर व्यक्तिमत्व स्फोटक असेल, सतत चिडणे रागावणे होईल. धनस्थानातील मंगळ हा घरात अशांतता , स्फोटक वातावरण ठेवतो . तृतीय स्थानातील मंगळ शेजारी, भावंडे ह्यांच्यात दुरावा निर्माण करेल. चतुर्थातील मंगळ आईशी दुरावा वितुष्ट निर्माण करेल. पंचमातील मंगळ खेळासाठी उत्तम पण अशा लोकांच्या नावावर काहीही करू नये .जल तत्वातील मंगळ त्यामानाने सौम्य असतो . पंचम स्थानातील मंगळ गर्भपात देतो .संततीशी मतभेत असतात . पंचमाशी मंगळाचा संबंध असेल आणि प्रथम संतती मुलगी असेल तर त्रासदायक नसतो . षष्ठात मंगळ शत्रूवर मात करतो .

सप्तमातील मंगळ तू तू मै मै करवतो. अष्टम स्थानात मंगळ असेल तर तो अपघात दर्शवतो ,आयुष्याला घातक असतो .ह्या मंगळाची दृष्टी ही धनस्थानावर  असते त्यामुळे स्वतःचे आणि जोडीदाराचे आयुष्य धोक्यात येते. अष्टम स्थानातील मंगळ हा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी कारणीभूत ठरतो . मंगळावर गुरूची दृष्टी असणे हे उत्तम पण गुरुवर मंगळाची दृष्टी असणे हे वाईट! एखाद्या पत्रिकेत मंगळ सप्तम स्थानाशी निगडीत असेल तर शनी त्या दुसऱ्या पत्रिकेत कुठल्याही प्रकारे सप्तम स्थानाशी निगडीत नको. मंगळ केतू , शुक्र केतू हे वाईट .

Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा... 

मंगळावर शनीची दृष्टी असेल तर एखाद्या वस्तूचे जेव्हा गतीत रुपांतर होते तेव्हा ती मंगळाच्या अधिपत्याखाली येते .मंगळ प्रधान व्यक्ती ही तापट, लवकर संतप्त होणारी ,नमते न घेणारी , कोमलपणा नसून अहंकार आणि उतावीळ ,दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा स्वभाव असणारी असते. पत्रिकेत मंगळ आहे पण तो खरच त्रासदायक आहे का हा विचार केला पाहिजे. मंगळ का कर्क राशीत, बुधाच्या राशीत असेल ,अस्तंगत असेल तर अशुभत्व कमी होते. प्रथम स्थानात मेषेचा ,चतुर्थात कर्केचा ,सप्तम स्थानात मकरेचा , अष्टमात सिंहेचा आणि व्यय स्थानात धनु राशीचा मंगळ असेल तर अशुभ नाही.मंगळ वक्री असेल तर तो मंगळ सौम्य होतो.

मंगळ पत्रिकेत  कुठेही असून लग्नेश सप्तमेश ह्यापैकी कठल्याही ग्रहावर दृष्टी टाकत असेल तर पती आणि पत्नी मध्ये वाद होतात .चंद्र आणि शुक्र युतीवर मंगळाची दृष्टी असेल तर पती आणि पत्नी मध्ये खटके उडतात .मंगळाची उपासना करायची असेल तर उत्तम म्हणजे गणपती स्तोत्र आणि मंगळाचा जप करणे. हनुमान चालीसा , सुंदरकांडाचा पाठ म्हणणे. श्रीसूक्त  , देवी अथर्वशीर्ष .गणपती अथर्व शीर्ष आवर्तने ,ऋणमोचक अंगारक स्तोत्र .मंगळ चंडिका स्तोत्र म्हणणे. 

मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे योग , प्राणायाम करून मुळात आपण आपला स्वभाव शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंगळ सदैव अमंगळ करेल असे गृहीत धरून चांगल्या पत्रिका डावलू नका, कदाचित तीच मुलगी तुमच्या मुलाचा संसार सुखाचा करणारी असेल.....सहमत ?

Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्न