शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Astrology: पुनर्विवाह केला तरी तो यशस्वी होण्याचा योग पत्रिकेत असावा लागतो, अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:20 IST

Astrology: विवाह व्हावा, टिकावा आणि फुलावा यासाठी ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून मुख्य घटक कोणते हे सांगणारी लेखमाला : भाग ८

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पूर्वीचा काळ वेगळा होता. पतीचे निधन झाले, तर स्त्री दुसरा विवाह करण्याची रीत नव्हती. किबहुना त्यावेळी स्त्रीचा पुनर्विवाह ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. विधवा म्हणून जीवन कंठत राहावे लागत असे. पण स्त्री गेली तर तिचे कार्य झाल्यावर लगेच पती मात्र विवाहबद्ध होत असे.  

आज २१ व्या शतकात विलंबाने विवाह ही जशी समस्या आहे, तशीच घटस्फोट ही सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे. घटस्फोट झाल्यानंतर पुढील जीवन एकट्याने व्यतीत करायचे का? हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी पुनर्विवाहाचा विचार पुढे येतो. स्त्री आता घराबाहेर पडत आहे आणि स्वतःचे करिअर करत आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. आजच्या काळात घटस्फोटाची कारणे म्हणजे वैचारिक मतभेद, विवाहबाह्य संबंध ही प्रामुख्याने समोर येतात. अनेकदा जोडीदाराचा आजारपणामुळे किंवा अपघाती मृत्यू होतो, त्यामुळे पुनर्विवाह करावा लागतो. मुले लहान, घरी वयस्कर आई वडील हेही कारण असते. 

Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!

पुनर्विवाहासाठी विचारणा आल्यास त्याला ह्यापुढे उत्तम वैवाहिक सुख मिळणार की नाही हे पाहावे लागते  प्रथम विवाहाचा विचार आपण सप्तम स्थानावरून करतो .द्वितीय विवाह हा भाग्यस्थानावरून पहिला जातो. अष्टमेश लग्नी किंवा सप्तमात असेल तर द्वितीय विवाहाचे योग पहिल्या पती/पत्नीच्या निधन झाल्यामुळे येतात. लग्नेश लग्नात किंवा षष्ठात असेल तर २ विवाह संभवतात. लग्नी मंगळ असेल आणि सप्तमेश ६, ८, १२ मध्ये असेल आणि पापग्रहांनी युक्त असेल तर पुनर्विवाह होऊ शकतो. मेष किंवा वृश्चिक लग्नात मंगळ असून सप्तम स्थानात बुध असेल आणि सप्तमेश शुक्र जर अष्टमात असेल तर एकापेक्षा अधिक विवाह होतात. 

सप्तमात बुध, मंगळ असतील किंवा बुध मंगळाच्या राशीत पापग्रह युक्त असेल. बुध हा एक घटना पुन्हा घडवतो. सप्तमेश बुध हा पापग्रहांनीयुक्त असून अशुभ नक्षत्रात असेल, सप्तम स्थानात उच्चीच्या किंवा निचीच्या ग्रहासोबत राहू किंवा केतू असतील तर, पुरुषाच्या पत्रिकेत १२ व्या स्थानी राहू असेल तर तो एकापेक्षा जास्त विवाह घडवतो . नवम स्थानात राहू केतू किंवा केतू गुरु असे ग्रह असतील तर किंवा पापग्रहांची उपस्थिती जास्त असेल तर पुनर्विवाह सहजासहजी होत नाही . शुक्र चांगला असेल ,नवमेश चांगल्या स्थितीत असेल दुसरा विवाह यशस्वी होतो.

Astrology: मंगळाची पत्रिका असेल तर मंगळी जोडीदारच शोधायचा का? शास्त्र सांगते... 

पुनर्विवाह आजच्या काळात आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीने तसेच मानसिक दृष्टीने सुद्धा. एकटेपणा जिव्हारी लागणारा असतो आणि त्यातून वैफल्य निर्माण होते आणि एकटेपणाच्या भावनेतून आत्मविश्वासाची कमी आणि मानसिक दौर्बल्य सुद्धा निर्माण होते. अनेकवेळा दोघानाही अपत्य असते त्यामुळे त्यांचाही विचार एकत्र येताना करावा लागतो . मुलांचा विचार सर्वप्रथम नाहीतर सगळेच दु:खी होतील. वैचारिक मतभेदामुळे पहिला विवाह मोडला असेल, तर दुसरा करताना तो निभावण्यासाठी पहिल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ह्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या स्वभावात अमुलाग्र बदलही करावा लागतो . दुसऱ्या विवाहात प्रेम नसते असेही नाही , सहवासातून प्रेम निर्माण होते पण अनेकदा तडजोड अधिक असते . ती करण्याशिवाय गत्यंतरही नसते हेही तितकेच खरे. विवाह टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते मग विवाह पहिला असो अथवा दुसरा!

संपर्क : 8104639230

Astrology: विवाह यशस्वी होण्यासाठी कुंडलीमिलन करताना कालानुरूप बदल झाले पाहिजेत; अन्यथा... 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप